घरठाणेमुख्यमंत्री निवासस्थानापासून काही अंतरावरील रस्त्याला खड्डे

मुख्यमंत्री निवासस्थानापासून काही अंतरावरील रस्त्याला खड्डे

Subscribe

आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली

राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे एकनाथ शिंदे यांनी हाती घेताच, ’मुख्यमंत्र्यांच्या बदलते ठाणे’ या अंर्तगत खड्डे मुक्ते रस्ते, सुशोभीकरण आदी कामांसाठी करोड रुपयांचा निधी ठाण्याला मिळाला. त्यानंतर ठाण्यातून खड्डे मुक्त प्रवास होईल असे वाटत असताना, पहिल्या पावसात ठाण्यात रस्त्यांना खड्डे पडल्याची बोंबाबोंब झाल्यावर तातडीने महापालिकेने ते खड्डे कोणत्या प्राधिकरणाच्या रस्त्यांवर पडले आहेत. ते न पाहता, मास्टीकने बुजवले. त्यातच आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थळाच्या काही मीटर अंतरावर नाशिक- मुंबई रस्त्यावर पावसाळ्यापूर्वी केलेल्या डांबरीकरण रस्त्याला अक्षरशः खड्डे पडले आहेत. तसेच टेंभीनाक्यावर काँक्रिटच्या रस्त्यावर टाकलेली डांबर गायब झाल्याने त्या ठिकाणी खड्डे पडल्याचे चित्र दिसत आहे. यावरून खड्डे मुक्त ठाणे असे म्हणायचे की खड्ड्यात ठाणे असे म्हणायचं असा प्रश्न ठाणेकरांना पडत आहे.

यंदाच्या पावसाळ्यात ठाणेकरांना खड्डे मुक्त रस्त्यांवरून प्रवास करता यावा, यासाठी सिमेंट, डांबरी आणि मास्टिकद्वारे रस्त्यांचे काम करण्यात आले. पण, पहिल्या पावसाळ्यात शहरतील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्ते, उड्डाण पुलांवर खड्डे पडू लागल्याचे चित्र दिसून आले होते त्याची तातडीने दाखल घेत, पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी रस्ते कोणत्या प्राधिकरणाचे आहेत. हे न पाहता खड्डे 12 तासात बुजविण्याचे आदेश पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. त्यावेळी 50 ते 60 टन मास्टिकचा वापर करत खड्डे बुजविण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहेत. त्यातच रस्त्यांना खड्डे पडू लागले आहेत. टेंभीनाक्यावर काँक्रीट रस्त्यावर डांबर टाकली होती. ती डांबर निघाल्याने खड्डे पडल्याचे दिसत आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थळापासून काही अंतरावर असलेल्या लेनिन नगर येथील मेट्रो स्टेशन असलेल्या नाशिक मुंबई महामार्गावर खड्डे पडले आहेत.

- Advertisement -

त्या रस्त्याने नाशिककडे जाणार्‍या डाव्या बाजूला मेट्रो कामामुळे बॅरिकेटिंग केली आहे. उजव्या बाजूला उड्डाणपूल आहे. त्यामुळे जाणार्‍या भरधाव वाहनांमुळे दुचाकीधारकाचा त्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भीती वर्तवली जात आहे. तसेच घोडबंदर रोडकडे जाणार्‍या उड्डाणपुलावर ही कापूरबावडी नाक्यावर उतरणार्‍या रस्त्यावर खड्डे पडून लागले आहेत. असेच शहरातील भागात खड्डे पडू लागले आहेत. या पडलेल्या खड्डयांनी आयुक्तांनी बारा तासात खड्डे बुजविण्याचे दिले आदेशांना काही दिवसात महापालिका संबंधित विभागाचे अधिकार्‍यांनी केराची टोपली दाखवली की काय अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -