घरठाणेदुकानांवर मराठीत पाट्या लावा अन्यथा कारवाई

दुकानांवर मराठीत पाट्या लावा अन्यथा कारवाई

Subscribe

पालिकेचा इशारा

उल्हासनगरातील जे दुकानदार मराठी पाट्या लावणार नाही अशा दुकानदारांविरोधात सक्त कारवाई केली जाईल, असा इशारा मनपा आयुक्तांनी व्यापर्‍यांच्या बैठकीत दिला. महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी दुकानासह अन्य आस्थापनावरील नामफलक मराठीत लावण्यासाठी व्यापार्‍यांची बैठक घेऊन त्यांना शासनाच्या आदेशबद्दल महिती दिली. यावेळी व्यापार्‍यांनी मराठी नामफलक बाबत सकारात्मक निर्णय घेतल्याने, सर्व आस्थापनावरील पाट्या मराठीतून दिसणार असल्याची ग्वाही दिली आहे.

उल्हासनगरातील विविध दुकाने, इतर आस्थापना यांच्यावरील नामफलक ठळक मराठी भाषेत करणेबाबत शासन आदेश आहे. शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने बुधवारी व्यापारी संघटना व व्यापार्‍यांची बैठक बोलाविली असून त्यांना दुकानावर मराठी नामफलक लावण्याबाबत सूचना व मार्गदर्शन केले. व्यापार्‍यांनी महापालिकेच्या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष जगदीश तेजवानी, दिपक छतवानी यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -