घरठाणेशहर पोलीस दलातील राबोडी पोलीस ठाण्याची सर्वोत्कृष्ट पाच पोलीस ठाण्यात निवड 

शहर पोलीस दलातील राबोडी पोलीस ठाण्याची सर्वोत्कृष्ट पाच पोलीस ठाण्यात निवड 

Subscribe

ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

२०२१ या वर्षातील कार्यमुल्यांकनाच्या बाबतीत परिक्षेत्र निहाय व आयुक्तालय निहाय प्राप्त उत्कृष्ट पोलीस ठाण्यांमधून खालीलप्रमाणे क्रमनिहाय सर्वोत्कृष्ट ५ पोलीस ठाण्यांची शिफारस राज्य स्तरावरील समितीने केलेली होती. त्यामध्ये ठाणे शहर पोलीस दलातील राबोडी पोलीस ठाण्याचे नाव असल्याची आनंदाची गोड बातमी पुढे आली आहे. त्यामुळे ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. याबाबत मंगळवारी घोषणा परिपत्रकाद्वारे करण्यात आली असून राबोडी पोलीस ठाणे हे ठाणे जिल्ह्यात नाहीतर कोकण विभागातील एकमेव सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे आहे. २०१६ मध्ये झालेल्या DGP/1GSP कॉलरन्समध्ये निकोप स्पर्धा वाढावी, तसेच कायदा व सूब्यवस्था, गुन्हे’ प्रतिबंध, दोषसिध्दी यामध्ये सुधारणा करावी यासाठी देशपातळीवर १० सर्वोत्कृष्ट पोलीस चाण्यांची (Best Police Station) निवड करण्याबाबतचा निर्णय केंद्रीय स्तरावर घेण्यात आला असून त्याप्रमाणे सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांची निवड भारत सरकार, गृह मंत्रालयाकडून करण्यात येते.

यास्तव या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस ठाण्यांचा विचार करून देशपातळीवर सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांच्या निवड प्रक्रियेत महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस ठाण्यांचा समावेश दृष्टीने तसेच राज्यातील पोलीस ठाण्यांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे, गुणवत्ता वाढविण्यास दिली. मर्यादेमध्ये उत्कृष्ट पध्दतीने काम करणे, तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्ह्यांचा तपास आणि कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने संबंधित पोलीस अधिकारी अंमलदार यांना प्रोत्साहित करणे, इत्यादी साध्य करण्यासाठी २०२० या वर्षापासून राज्यांचा करुन सदर पोलीस ठाण्यांना सन्मानचिन्ह व रोख बक्षिस प्रदान करण्यात येत आहेत. २०२१ या वर्षातील काल्याच्या बाबतीत राज्य पातळीवर सर्वोकृष्ट पोलीस स्पर्धेकरीता निश्चित करून दिलेले गुणांकन, निकष व नियमावली इ. बाबी बारकाईने विचारात घेवून घटकातील सर्व पोलीस ठाण्यांचे मूल्यमापन करून त्यापैकी २ उत्कृष्ट पोलीस ठाणे यासाठी स्तरावर समिती, तसेच परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस आयुक्त यांनी घटक निहाय परिमंडळ निहाय प्राप्त प्रत्येकी २ पोलीस ठाण्यांमधून परिक्षेत्र, आयुक्तालय स्तरावर

- Advertisement -

ठाण्यांची निवड करण्यासाठी परिक्षेत्रीय स्तरावर समिती आणि परिक्षेत्र निहाय व आयुक्तालय निहाय प्राप्त उत्कृष्ट पोलीस मधून सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यासाठी राज्य स्तरावर समिती गठीत करण्यात आली होती.एकंदरीत सन २०२१ या वर्षातील कार्यमुल्यांकनाच्या बाबतीत परिक्षेत्र निहाय व आयुक्तालय निहाय प्राप्त उत्कृष्ट पोलीस ठाण्यांमध्ये सर्वोत्कृष्ट ५ पोलीस ठाण्यांची शिफारस राज्य स्तरावरील समितीने केलेली असून त्या ५ पोलीस ठाण्यांना सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे- २०२१ म्हणून घोषित केल्याची माहिती अप्पर पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी काढलेल्या पत्रकाद्वारे पुढे आली आहे.

सर्वोत्कृष्ट म्हणून निवड झालेल्या पोलीस ठाणे
शिवाजीनगर पोलीस ठाणे (कोल्हापूर)
देगलूर पोलीस ठाणे ( नांदेड)
वाळुंज पोलीस ठाणे (छत्रपती संभाजी नगर शहर)
अर्जुनी मोर पोलीस ठाणे (गोंदिया)
राबोडी पोलीस ठाणे (ठाणे शहर)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -