घरठाणे‘अ’ प्रभागात सव्वाशे अनधिकृत बांधकामे अडचणीत

‘अ’ प्रभागात सव्वाशे अनधिकृत बांधकामे अडचणीत

Subscribe

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात अनाधिकृत बांधकामाचा डोलारा उभा राहत असतानाच वाढत्या बांधकामांनी अ प्रभाग क्षेत्रातील बांधकाम व्यवसायिकांना नोटीस बजावत कामे बंद करण्याची तंबी देण्यात आली आहे. सुमारे सव्वाशेच्या आसपास सुरू असलेली अनाधिकृत बांधकामे सद्यस्थितीत बंद ठेवण्यात सहाय्यक आयुक्तांना यश आल्याने ही बांधकामे आहे त्या स्थितीत आहेत. अ प्रभाग क्षेत्रात येत असणार्‍या शहाड, वडवली, अटाळी, आंबिवली, मोहने, गाळेगाव, मांडा,टिटवाळा, बनेली आदी परिसरात अनाधिकृत बांधकामांनी परिसराला मोठा विळखा घातला आहे.

चाळीसह आरसीसी बांधकाम आणि गेल्या एक ते दीड महिन्यात आड बाजूला आणि लपून-छपून चालणारी बांधकामे सहाय्यक आयुक्तांच्या निदर्शनासह आली आहेत. अनधिकृत बांधकामांना प्रशासकीय स्तरावर एकीकडे मेहर नजर दिली जात असताना अ प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त प्रीती गाडे यांनी आपल्या पथकातील विशेष कर्मचार्‍यांना याबाबत कामाला लावत अनधिकृत बांधकामाची यादी तयार केल्याची माहिती मिळून येत आहे. अ प्रभागातील सुरू असलेल्या कामांना लगाम घालण्याचे काम सुरू केल्याने बांधकाम व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रात शासनाच्या प्रतिनियुक्तीवर प्रथमच सहाय्यक आयुक्त म्हणून प्रीती गाडे त्यांची नियुक्ती पालिका आयुक्त डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांनी केले आहे. सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बांधकामांचा वाढत असलेला पसारा गाडे यांच्या निदर्शनात आल्याने सुमारे सव्वाशे च्या आसपास सुरू असलेल्या बांधकामांना ब्रेक लावण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. सुरू असलेली बांधकामे अर्धवट स्थितीत जैसे थे अवस्थेत थांबविण्याचे आदेश दिल्याने बांधकाम व्यावसायिक अडचणीत आले आहेत. या बांधकामांना नोटीस बजावत नवीन बांधकामांना आपल्या रडारवर आणून काही बांधकामे हटवण्याचे धोरण येथे अवलंबिले गेले आहे.

- Advertisement -

अ प्रभागातील वाढत्या अनधिकृत बांधकामांना आळा बसविल्याचे भासविले जात असताना या बांधकामांना तोडण्याची मोठी जबाबदारी गाडे यांना सहाय्यक आयुक्त म्हणून पार पाडावी लागणार आहे. अनाधिकृत बांधकामाच्या संदर्भात सहाय्यक आयुक्त प्रीती गाडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यामुळे त्यांची याबाबत प्रतिक्रिया समजू शकली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -