घरठाणेएकाच फाईलवर १३ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या, पालिका आयुक्तांनी अधिकाऱ्याचे टोचले कान

एकाच फाईलवर १३ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या, पालिका आयुक्तांनी अधिकाऱ्याचे टोचले कान

Subscribe

आयुक्तांनी खास मोबाईलमध्ये काढलेल्या फोटोमधून दिले दाखवून

एकीकडे ठाणे महापालिका प्रशासन गतिमान कामकाजाचा टेंभा मिरवत असताना, मात्र महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी त्या कारभाराची पुरती हवा काढून टाकली आहे. त्यांनी एका फाईलवर किती जणांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक असतात, असा सवाल उपस्थित केला. तसेच एका फाईलवर त्यांनी त्यांच्यासह १३ जणांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे दाखवत त्यांनी पालिका अधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले. तसेच अशाप्रकारे एखादी फाईल येत असेल तर हा वेळ खाऊ पणा आहे. यापुढे आवश्यक असलेल्या स्वाक्षऱ्या बाबत नियमावली तयार करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

मंगळवारी महापालिका आयुक्तांच्या दालनात आमदार सरनाईक यांनी एक बैठक बोलवली होती. त्यावेळी, एका विषयाची माहिती घेत असताना, घोडबंदर रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या नागरिकांना समता नगर येथील एका जागेवर वसविण्यात आलेल्या वस्तीची दुरवस्था झाली असून त्याचे बायोमेट्रिक सर्व्हेक्षण करण्याबाबत आमदार सरनाईक यांनी मुद्द उपस्थित केला. यावेळी त्यासाठी लागणाऱ्या खर्चावरून पालिका आयक्त बांगर यांनी प्रश्न उपस्थित केले. तसेच हे काम पालिका निधीतून करता येईल का असा प्रश्न उपस्थित करीत त्याबाबतची टिप्पणी लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना दिल्या. याच मुद्द्यावरून पालिका आयुक्त बांगर यांनी एक फाईलवर आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्यासह तब्बल १३ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असतात. हे त्यांनी  त्यांच्या मोबाईल फोनमध्ये एका फाईलवर असलेल्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांच्या काढलेल्या फोटोवरून मोजून दाखविले. त्यामुळे यापुढे फाईलवर आवश्यक असलेल्या स्वाक्षऱ्याबाबत नियमावली तयार करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -