घरमहाराष्ट्रगॉसिप करायला वेळ कसा मिळतो; सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर निशाणा

गॉसिप करायला वेळ कसा मिळतो; सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर निशाणा

Subscribe

सुळे पुढे म्हणाल्या, फडणवीस यांनी उपस्थित केलेला मुद्दा हा चर्चेचा विषयच नाही. तो केवळ फडणवीस यांच्या राजकारणासाठी सोयीचा असू शकतो. सद्या माध्यमांमध्ये फडणवीसांच्या बातम्या लागत नसतील म्हणून त्यांना शरद पवार यांचा आधार घ्यावा लागत असेल. त्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नसावा. 

 

परभणीः देवेंद्र फडणीस यांच्याकडे सहा-सहा खात्यांची धुरा आहे. असे असताना त्यांना गॉसिप करायला वेळ कसा मिळतो, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी लगावला.

- Advertisement -

अजित पवार यांच्यासोबत पहाटे झालेल्या शपथविधीची कल्पना शरद पवार यांना होती, असा दावा फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केला. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. खुद्द शरद पवार यांनी हा दावा फेटाळून लावला. फडणवीस हे सुज्ञ आहेत. असत्याच्या जोरावर ते असं वक्तव्य करतील असं वाटलं नव्हतं, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. तर कॉंग्रेसही शरद पवार यांच्या पाठिशी उभे राहिले. शरद पवार हे लपून छपून राजकारण करणार नाहीत. ते खुलेआम भूमिका मांडणारे आहेत, असे कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही फडणवीस यांच्यावर टीका केली.

तर फडणवीस यांच्या दाव्याचे भाजप नेत्यांनी समर्थन केले. फडणवीस असत्य बोलणार नाहीत. त्यांनी सत्ता सोडली. पण सत्याची साथ सोडली नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

- Advertisement -

मात्र सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. त्या म्हणाल्या, फडणवीस असे वक्तव्य करतील असे वाटले नव्हते. मात्र त्यांनाही शरद पवार यांच्याशिवाय कोणाचाच आधार नाही. त्यांच्या पक्षातील लोक त्यांना कुठेच हलू देत नाहीत. त्यामुळे शरद पवार यांचे नाव घेऊन फडणवीस नवनवीन वावड्या उठवत असतात. मुळात फडणवीस यांच्याकडे सहा सहा खात्यांची धुरा आहे. असे असताना त्यांना गॉसिप करायला वेळ कसा मिळतो. मला तर राज्याची चिंता वाटत आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, फडणवीस यांनी उपस्थित केलेला मुद्दा हा चर्चेचा विषयच नाही. हा मुद्दा केवळ फडणवीस यांच्या राजकारणासाठी सोयीचा असू शकतो. सद्या माध्यमांमध्ये फडणवीसांच्या बातम्या लागत नसतील म्हणून त्यांना शरद पवार यांचा आधार घ्यावा लागत असेल. त्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नसावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -