घरठाणेलहान नाले, छोटी गटारे नियमित स्वच्छ व्हावीत

लहान नाले, छोटी गटारे नियमित स्वच्छ व्हावीत

Subscribe

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश

येणारा पावसाळा लक्षात घेता शहरातील लहान नाले, छोटी गटारे नियमित स्वरुपात साफ करुन घेण्याबाबतचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व प्रभागांच्या सहाय्यक आयुक्त यांना दिले आहेत. त्यामुळे गुरुवारी सकाळपासूनच अ प्रभागाचे सहा. आयुक्त सुहास गुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या मदतीने अंतर्गत नाल्यांची साफसफाई करण्याचे काम सुरू केले.

त्याचप्रमाणे क प्रभागातही सहाय्यक आयुक्त सुधिर मोकल यांनी कल्याण पश्चिम परिसरात आरोग्य निरिक्षक जगन्नाथ वड्डे आणि इतरांच्या मदतीने संतोषी माता रोड-सहजानंद चौक-छत्रपती शिवाजी महाराज चौक – महमंद अली चौक-म. फुले चौक तसेच कल्याण स्टेशन परिसर,गावदेवी रोड, लालचौकी रोड, सुभाष नगर रोड, दुध नाका,राममारूती रोड, निक्की नगर, चौधरी मोहल्ला, आधारवाडी चौक, आणि मेन रोड परिसरातील साफसफाई करून घेतली. आणि जोशीबाग परिसरातील,पंचमुखी परिसरातील तसेच अन्सारी चौक येथील गटारातील गाळ काढून साफ करण्याची कारवाई घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचार्‍यांमार्फत करुन घेतली.

- Advertisement -

तसेच चार जे प्रभागात प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी कल्याण पूर्व परिसरातील आरोग्य निरीक्षक दिघे व इतर कर्मचा-यांच्या मदतीने मंगल राघोनगर, चिकनीपाडा, जरीमरीनगर,वालधुनी या परिसरातील गटारे साफसफाई करुन गाळ काढण्याची कारवाई केली. ड प्रभागामध्ये सहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी प्रभागातील आरोग्य निरिक्षक यांच्या अधिपत्याखाली कल्याण पूर्व परिसरातील पुना लिंक रोड आणि श्रीमलंग रोड, चक्की नाका परिसरातील रस्त्यांची साफसफाई करून संपूर्ण रस्त्याच्या दुर्तफा फुटपाथ आणि डिव्हायडर, रस्त्यावरील आजूबाजूच्या परिसरात निदर्शनास येणारा कचरा, रॅबिट, इत्यादी उचलून साफसफाई करुन घेतली. तसेच शास्त्रीनगर टेकडी, शनीनगर, विजयनगर या परिसरात असलेल्या छोट्या गटारांमधील चोकअप काढून गटारे साफसफाई करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -