घरक्रीडाBabar Azam: सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले, बाबर आजमचा नवा रेकॉर्ड

Babar Azam: सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले, बाबर आजमचा नवा रेकॉर्ड

Subscribe

पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम सध्या भलत्याच चांगल्या फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील एक दिवसीय सिरीजमध्ये बाबर आजमने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. दोन स्फोटक शतकी खेळीनंतर बाबर आजमने आपली आयसीसी रॅंकिंगमधील वर्चस्व आणखी मजबुत केले आहे. ऑलटाईम रॅंकिंग लिस्टमध्ये सर्वाधिक अंक मिळवत बाबर आजमने क्रिकेट विश्वातील दिग्गज फलंदाज असलेल्या सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले आहे.

- Advertisement -

नुकत्याच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बाबरने सातत्याने चांगली खेळी करत मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळवले होते. कसोटी मालिकेतही बाबरचा फॉर्म चांगला राहिला होता. कसोटी सामन्यात त्याने ३९० धावा केल्या. त्यामध्ये १९६ धावांच्या खेळीचाही समावेश आहे. तीन मॅचच्या सिरीजमध्ये बाबरने लागोपाठ दोन शतकांची खेळी केली. या मालिकेत २-१ ने फरकाने संघाला विजय मिळवून देण्यात त्याचा वाटा महत्वाचा होता. आयसीसी रॅंकिंगमध्ये चांगल स्थान मिळवण्यासाठी याची मदत झाली.

आयसीसीच्या फलंदाजांच्या रॅंकिंगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या ऑल टाइम यादीत सचिनला मागे टाकत बाबर आजमने वरचे स्थान मिळवले आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यादीमध्ये १५ व्या स्थानी होता. पण आजमने ८९१ पॉइंट्स मिळवत सचिनला मागे टाकले. यादीमध्ये पहिल्या स्थानावर वेस्ट इंडिजचा फलंजाज असलेला विव रिचर्ड पहिल्या स्थानावर आहे. त्यांच्या नावे ९३५ पॉइंट्सचा रेकॉर्ड आहे. तर दुसऱ्या स्थानावर ९३१ पॉइंट्ससह जहीर अब्बास यांच नाव आहे. तर तिसऱ्या स्थानावर ९२१ पॉइंट्ससह ऑस्ट्रेलियाचे माजी कॅप्टन ग्रेग चॅपल यांचा क्रमांक आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -