घरठाणेक्षयरोग मोबाईल अॅप बनविणारी ठामपा पहिली महापालिका

क्षयरोग मोबाईल अॅप बनविणारी ठामपा पहिली महापालिका

Subscribe

'टीबी मुक्त ठाणे ' असे अॅप मराठीत असेल

क्षयरोगासंदर्भात फक्त केंद्र सरकारचा एक अॅप असून तो सुद्धा इंग्रजीत आहे. त्यातच इतर कोणीही या आजाराबाबत मोबाईल अॅप तयार केला नाही. याचदरम्यान या आजाराचे रुग्ण कमी व्हावे आणि उपचार पध्दती अधिक सोपी व्हावी यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने मोबाइल अॅपची निर्मिती केली असून त्याचे नाव ‘टीबी मुक्त ठाणे ‘ असे असणार आहे. अशाप्रकारे मोबाईल अॅप तयार करणारी पहिलीच महापालिका ठरणार आहे. तो अॅप मराठीत असून रुग्णाला चाचणी अहवालासह संपूर्ण औषधोपचार, ट्रिटमेंट विषयी माहिती, डॉक्टरांच्या भेटी आदी माहिती एका क्लिकवर मराठी उपलब्ध होणार आहेत. तसेच या शुभारंभ येत्या २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिनी केले जाणार असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

क्षयरोग (टीबी) मुक्त शहरासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने एक अॅप तयार केले असून या अॅपच्या माध्यमातून टीबी रुग्णांना तात्काळ चाचणी अहवाल मिळणार आहे. संपूर्ण औषधोपचाराच्या माहितीपासून ते पुन्हा डॉक्टरकडे जाण्याची तारीख याविषयी या अॅपद्वारे रु ग्णांना अलर्ट मिळणार असून अॅपद्वारे टीबी संदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. या अॅपमध्ये डॉक्टरांसाठी लॉगिन देण्यात आले आहे. जेणेकरून डॉक्टरांना लॉगिन केल्यानंतर संबंधित रु ग्णांचे अहवालापासून ते रु ग्णांवर केलेल्या उपचाराची माहिती लगेच कळणार आहे. याशिवाय चाचणी अहवाल संदर्भात रु ग्णांना एसएमएस देखील जाईल. या एसएमएसमधील लिंक उघडल्यानंतर रु ग्णांना चाचणी अहवाल उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

रुग्णांना अहवाल उशिरा मिळत असून रुग्णाला डॉक्टरकडे संपूर्ण फाईल घेऊन जावे लागते. यापूर्वी रु ग्णांवर काय उपचार केले याबाबत फाईलमधील रुग्णांचे संपूर्ण पेपर डॉक्टरांना बघावे लागतात. परिणामी रु ग्णांची संपूर्ण माहिती एका क्लिकवर डॉक्टरांना मिळावी तसेच रुग्णांना अहवालासाठी जास्त दिवस प्रतीक्षा करावी लागू नये यासाठी महापालिका प्रशासनाने टीबी मुक्त ठाणो या नावाचे एक अॅप तयार केले आहे.

आणखीन एक विशेष बाब म्हणजे अहवाल ऑनलाईन अपलोड झाल्यानंतर तात्काळ रु ग्णांना एक एसएमएस जाईल. शिवाय टीबी मुक्त अॅपमध्ये हा अहवाल उपलब्ध होणार असून एसएमएस मधील लिंक उघडल्यानंतर रु ग्णांना अहवाल दिसेल. तसेच डॉक्टरांची कोणत्या तारखेला अपॉईंटमेंट आहे, त्या विषयी रु ग्णांना अलर्ट मिळणार आहे. शिवाय आतापर्यंत रु ग्णांवर कोणते उपचार करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती अॅपमध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेचे क्षयरोग अधिकारी, फुप्फुसरोग तज्ञ डॉ. प्रसाद पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -