घरठाणेThane crime: ठाणे पोलिसांकडून ५१४ गुन्हे दाखल

Thane crime: ठाणे पोलिसांकडून ५१४ गुन्हे दाखल

Subscribe

आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून म्हणजे १६ मार्च २०२४ पासून ते ३० एप्रिल २०२४ या कालावधीत पोलिसांनी विविध मोहिमेत एकूण ५१४ गुन्हे दाखल केले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी धडक मोहीम हाती घेवून एकूण ५१४ केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात २३ भिवंडी, २४ कल्याण आणि २५ ठाणे लोकसभा मतदारसंघात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू आहे. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे पोलीस विभागाकडून जिल्ह्यात चोख बंदोबस्त सुरू आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग होवू नये, यासाठी पोलीस विभागाने अनेक ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून म्हणजे १६ मार्च २०२४ पासून ते ३० एप्रिल २०२४ या कालावधीत पोलिसांनी विविध मोहिमेत एकूण ५१४ गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये २३ भिवंडी लोकसभा मतदारसंघात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार ५ गुन्हे, प्रतिबंधात्मक कारवाईच्या ७८ आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी ४६ गुन्हे दाखल झाले आहेत. २४ कल्याण लोकसभा मतदारसंघात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार २५, प्रतिबंधात्मक कारवाईच्या २११,बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी ७२ आणि एक इतर गुन्हे दाखल झाले आहेत. २५ ठाणे लोकसभा मतदारसंघात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार ९, प्रतिबंधात्मक कारवाईचे ३० आणि आर्म अ‍ॅक्टसंबंधीचे ३७ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

जिल्ह्यात केलेल्या कारवायांमध्ये प्रतिबंधात्मक कारवाईचे एकूण ३१९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये ५ हजार ५३१ लिटर दारु, २४१ एमएल (७१ हजार ३३० लिटर वॉश), किंमत- रुपये ३० लाख ८५ हजार १३०, रोख रक्कम २६ हजार ६६० रुपये आणि १ टेम्पो, १ कार, १ मोबाईल व एक मोटारसायकल जप्त करण्यात आले आहेत.
बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकूण १५५ गुन्हे दाखल करण्यात आले असून १३८ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ११ पिस्टल, २ रिव्हॉल्व्हर, ९ गावठी कट्टे, १ एअर गन, असा एकूण ७ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच ४८ जिवंत काडतुसे (किंमत- रु.११ हजार ९५०), १४९ कोयता, चॉपर, चाकू, सुरा, तलवार, किंमत रु. ३५ हजार २७५, १० मोबाईल व ९ वाहनेही जप्त करण्यात आले असून ९०० रु. रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे.

- Advertisement -

अंमली पदार्थ विरोधी कारवाईत एकूण ३९ गुन्हे दाखल करण्यात आले असून २.८६०.१२ किलोग्रॅम एमडी पावडर (किंमत – रु.२७ कोटी ८२ लाख ४९ हजार २०२), कोकीन पावडर २७.०५ ग्रॅम (किंमत- रु.११ लाख), गांजा ३७ किलो २७३ ग्रॅम (किंमत रु.६ लाख ४३ हजार ४५०), कफ सिरफ १८ बॉटल (रु. ३ हजार ५१०), ब्राऊन शुगर १०४ ग्रॅम (किंमत रु.५ लाख २० हजार ), असा एकूण २८ कोटी ४ लाख ३५ हजार ५६२ रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तसेच ७ वाहने व १४ मोबाईलसह १ लाख ९३ हजार १३० रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. तसेच बेकायदेशीरपणे गुटखा बाळगणे व विक्रीसंदर्भात एकूण १५ गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये रु. ७५ लाख २१ हजार ५३८, (५ वाहन व ४ मोबाईल सह) इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ७०० रुपये रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे. तसेच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात ५ लाख ४० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -