घरठाणेठाणे पोलिसांनी हरवलेले आणि चोरीस गेलेले 70 मोबाईल फोन केले हस्तगत

ठाणे पोलिसांनी हरवलेले आणि चोरीस गेलेले 70 मोबाईल फोन केले हस्तगत

Subscribe

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून चोरीस गेलेले व हरवलेल्या मोबाईलपैकी सुमारे 14 लाख रुपये किंमतीचे वेगवेगळया कंपनीचे एकूण 70 मोबाईल फोन हस्तगत करण्यात शहर पोलीस दलातील खंडणी विरोधी पथक, व मध्यवर्ती गुन्हे शोध कक्ष यांना यश आले आहे. तर ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबीवली, उल्हासनगर, बदलापूर परिसरातील रहिवाश्यांना अशाप्रकारे चोरीस गेलेले व गहाळ झालेले मोबाईल फोन बाबतची माहिती जवळच्या पोलीस ठाणे देवुन https://ceir.gov.in या वेबसाईटवर अपलोड करावी. असे आवाहन ही पोलिसांनी केले आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयाचे हद्दीतून मोबाईल चोरीचे व गहाळ होण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेत, शहर पोलीस गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी याबाबत आढावा बैठक घेत, त्या मोबाईलचा व आरोपीतांचा शोध घेण्याबाबत विशेष मोहिम राबवण्याचे आदेश खंडणी विरोधी पथक, व मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षेला दिले होते. यासाठी दोन विशेष पथकांची नेमणूक करून चोरीस गेलेल्या व गहाळ झालेल्या मोबाईलचे त्यांच्या आयएमईआय नंबरवरून तसेच दुरसंचार विभाग, भारत सरकारकडून, चोरीस गेलेले व गहाळ झालेल्या मोबाईलबाबत असलेल्या https://ceir.gov.in या वेबसाईटच्या मदतीने खंडणी विरोधी पथकाने 12 लाख 40 हजार रूपये किमतीचे वेगवेगळया कंपनीचे एकूण 55 मोबाईल तर मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षेने एकूण 1 लाख 50 हजार रूपये किमतीचे वेगवेगळया कंपनीचे एकूण 15 मोबाईल असे एकूण 13 लाख 90 हजार रूपये किमतीचे वेगवेगळया कंपनीचे एकूण 70 मोबाईल हस्तगत केले आहे.

- Advertisement -

ही कामगिरी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे, मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सत्यवान सोनवणे, पोलीस हवालदार संजय बाबर, जगन्नाथ सोनवणे, योगीराज कानडे, कल्याण ढोकणे, संदिप भोसले, नामदेव मुंढे, सुहास म्हात्रे, पोलीस नाईक भगवान हिवरे, शितल पावसकर, पोलीस शिपाई देवेंद्र देवरे, तानाजी पाटील, मयुरी भोसले तसेच पोलीस हवालदार नासीर सय्यद, पोलीस शिपाई दत्ता घोडके यांनी केली आहे.


शिंदे गटातील आमदारांना अमित शाहांनी मूल्यांची शिकवण द्यावी, सुप्रिया सुळेंचा टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -