घरठाणेकल्याण लोकसभेसाठी २ हजार मतदान केंद्रे

कल्याण लोकसभेसाठी २ हजार मतदान केंद्रे

Subscribe

डोंबिवली । कल्याण लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांनी कोणती खबरदारी घ्यायची याचे निर्देश निवडणूक आयोगाने जाहीर केले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात मतदारांच्या सोयीसाठी 2 हजार मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर असतील. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक केंद्र दिव्यांग कर्मचार्‍यांकडून, एक केंद्र युवक कर्मचार्‍यांकडून आणि एक केंद्र महिला कर्मचार्‍यांकडून चालवले जाईल. लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीदरम्यान उमेदवार केवळ 95 लाख रुपये खर्च करू शकतो. अशी माहिती आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 20 सांख्यिकी सर्वेक्षण पथके स्थापन करण्यात आली असून ती 24 तास काम करतील, जे सर्व राजकीय कार्यक्रमावर लक्ष ठेवतील.
प्रत्येक सहा विधानसभा मतदारसंघनिहाय भागात 3 फ्लाइंग स्क्वॉड टीम देखील स्थापन केल्या आहेत. निवडणूक आयोगाने उमेदवारांना राजकीय रॅली किंवा इतर राजकीय कार्यक्रमांना परवानगी मिळण्यासाठी एक खिडकी यंत्रणा उभारण्याची योजना आखली असल्याची माहिती त्यांनी आधी जाहीर केली होती त्यातच आता त्यांनी 26 एप्रिल पासून 3 मे पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहेत. यातील 3 दिवस सुट्टीचे वगळता 5 दिवस कामाचे राहणार आहेत. 5 दिवसात उमेदवारी अर्ज भरला जाऊ शकतो. 4 मे ला छाननी होईल व 6 मे पर्यंत माघार घेण्याचा कालावधी आहे.6 तारखेला निवडणूक चिन्ह वाटप होईल. मत पत्रिकेचा नमुना तयार होईल. तसेच 18 मे पर्यंत उमेदवारास प्रचार करण्याचा कालावधी असून या 18 मे नंतर मात्र कोणत्याही स्टार प्रचारक आणि इतर प्रचाराच्या दृष्टीने महत्वाच्या व्यक्तींना मतदार संघात राहण्यास मनाई करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -