घरट्रेंडिंगRanu Mondal is back : रानू मंडलने गायले व्हायरल गाणे 'कच्चा बदाम'...

Ranu Mondal is back : रानू मंडलने गायले व्हायरल गाणे ‘कच्चा बदाम’ अन् …

Subscribe

सध्या बंगाली गाणं कच्चा बादाम सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. पश्चिम बंगालच्या मुंगफली विक्रेताने गायलेले हे गाणे मोठ्या प्रमाणात ट्रेंड होताना पाहायला मिळत आहे. हे नवं गाणं प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडले आहे. त्यामुळे अनेक सोशल मिडिया युझर्सने या गाण्यावर व्हिडिओ केल्या आहेत.

सध्या बंगाली गाणं कच्चा बदाम सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. पश्चिम बंगालच्या मुंगफली विक्रेताने गायलेले हे गाणे मोठ्या प्रमाणात ट्रेंड होताना पाहायला मिळत आहे. हे नवं गाणं प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडले आहे. त्यामुळे अनेक सोशल मिडिया युझर्सने या गाण्यावर व्हिडिओ केल्या आहेत. याच गाण्यावर रानू मंडलनेही गाणे गायले असून सोशल मिडियावर बऱ्याच प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

हा व्हिडीओ’शायनी गर्ल’ नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये रानू मंडल कच्चा बदाम गाताना दिसत आहे. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून आतापर्यंत हा व्हिडिओ 77 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर कमेंट्सचा ओघ आला आहे. यूजर्स रानू मंडलला जोरदार ट्रोल करत आहेत. याआधीही रानू मंडलने बालपणीच्या प्रेमाचे गाणे गायले होते आणि त्यानंतरही यूजर्सनी तिला खूप ट्रोल केले होते.

- Advertisement -

रानू मंडल रातोरात स्टार बनली होती 

रानू मंडल 2019 मध्ये प्रसिद्धीच्या झोतात आली जेव्हा तरुण अभियंता अतिंद्र चक्रवर्ती यांनी ‘एक प्यार का नगमा है’ गाताना तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रानू रातोरात स्टार झाली. त्यानंतर त्याने गायक हिमेश रेशमियाच्या हॅपी हार्डी आणि हीर या चित्रपटासाठी गाणे गायले. हे गाणेही खूप गाजले पण रानू मंडलची प्रसिद्धी फार काळ टिकली नाही आणि ती पुन्हा तिच्या दुनियेत आली पण अनेकदा तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.

- Advertisement -

रेल्वे स्टेशनवर गाणे गाऊन आपले पोट भरणाऱ्या रानू या एका व्हिडिओमधून त्यांचे आयुष्य बदलले. व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर हिमेश रेशमियाने बॉलिवूडमध्ये रानू मंडल यांना संधी दिली आणि रानू मंडल यांनी गायलेली इतर गाणीही लोकप्रिय झाली. मात्र,ही लोकप्रियता आणि यश हे रानू यांच्यासाठी क्षणिकच ठरलं.


हे ही वाचा – 42 रुपये जमा करून महिन्याला 1,000 रुपये मिळवणाऱ्यांची संख्या जास्त, नेमकी योजना काय?


 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -