घरमहाराष्ट्र26/11 : पोलीस जिमखान्यावर फक्त मुख्यमंत्रीच; उपमुख्यमंत्री अजित पवार ट्रायडंटमध्ये!

26/11 : पोलीस जिमखान्यावर फक्त मुख्यमंत्रीच; उपमुख्यमंत्री अजित पवार ट्रायडंटमध्ये!

Subscribe

मुख्यमंत्री पोलीस जिमखान्यावर २६/११च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहत असताना अजित पवार मात्र प्रोटोकॉलनुसार उपमुख्यमंत्री या नात्याने त्यांच्यासोबत नव्हते. ते हॉटेल ट्रायडंटमध्ये होते. त्यामुळे यावरून नवी चर्चा सुरू झाली आहे.

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८रोजी झालेल्या भीषण हल्ल्याला आज ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या पोलीस जिमखाना ग्राऊंडवर या हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी खुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील असणं अपेक्षित होतं. मात्र, यावेळी फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होते. अजित पवार हॉटेल ट्रायडंटमध्ये थांबले होते. विशेष म्हणजे, यावेळी उपमुख्यंमत्र्यांसाठी असलेला ताफा सोबत न घेता अजित पवार एकटेच ट्रायडंट हॉटेलमध्ये गेल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ट्रायडंटमध्ये त्यांनी भाजप नेते भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन त्यांच्याशी तासभर चर्चा केली, असं देखील सांगितलं जात आहे.

देवेंद्र फडणवीस-अजित पवार एकत्र का येत नाहीत?

पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार फक्त यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी राजभवनात एकत्र दिसले होते. मात्र, त्यानंतर ते एकत्र आल्याची कोणतीही माहिती नाही. शिवाय, आज शहिदांना आदरांजली अर्पण करण्यासाठी देखील फक्त मुख्यमंत्रीच उपस्थित होते. त्याच वेळी अजित पवार मात्र हॉटेल ट्रायडंटमध्ये एकटेच गेले होते. शिवाय, राज्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीला देखील अजित पवार अनुपस्थित होते. त्यामुळे या सगळ्या प्रकाराकडे संशयाच्या नजरेनं पाहिलं जात आहे.

- Advertisement -

दरम्यान, अजित पवारांसोबत शपथविधीवेळी असलेल्या ११ आमदारांपैकी फक्त १ आमदार अण्णा बनसोडे हेच अजित पवारांसोबत राहिले असून इतर आमदार पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात परतले आहेत. त्यामुळे आता अजित पवार आणि भाजपची काय भूमिका असेल, याकडे साऱ्यांचं लक्ष आहे. बहुमत आम्हीच सिद्ध करू, असा विश्वास भाजपचे नेते माध्यमांशी बोलताना व्यक्त करत आहेत. मात्र, १६२ चं संख्याबळ महाविकासआघाडीकडे असताना भाजपला बहुमताचं संख्याबळ कुठून मिळणार? असा प्रश्न केला जात आहे.


भाजपला धक्का; व्हीप बजावण्याचे अधिकार अजितदादा नव्हे, जयंत पाटलांनाच!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -