घरमहाराष्ट्रभाजपची पहिली १२५ उमेदवारांची यादी जाहीर; चंद्रकांत पाटील कोथरूडमधून लढणार

भाजपची पहिली १२५ उमेदवारांची यादी जाहीर; चंद्रकांत पाटील कोथरूडमधून लढणार

Subscribe

नागपूर दक्षिण-पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस निवडणूक लढविणार आहेत. तर चंद्राकांत पाटील कोथरूड मधून लढविणार आहेत. पुण्याच्या महापौर यांना कसबा पेठ इथून उमेदवारी जाहीर झाली आहे. या मतदारसंघातून गिरीश बापट याआधी आमदार होते. ५२ विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे, तर १२ आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. दरम्यान १२५ उमेदवारांच्या यादीमध्ये एकनाथ खडसे यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांचं तिकीट कापलं गेल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, अद्याप त्यांचा मतदारसंघ असलेल्या मुक्ताईनगरमधील उमेदवाराचं नाव देखील अद्याप जाहीर करण्यात आलं नसल्यामुळे अजूनही एकनाथ खडसेंना संधी असल्याचं बोललं जात आहे.

हे वाचा – भाजपने ‘या’ १२ विद्यमान आमदारांचे तिकीट कापले; नवीन उमेदवार जाहीर

- Advertisement -

BJP first candidate list

BJP first candidate list 2

- Advertisement -

BJP first candidate list 3

BJP first candidate list 4

दरम्यान, भाजपने १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली असतानाच शिवसेनेला सोडलेल्या १२४ जागांची यादी देखील समोर आली आहे. त्यामुळे जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला १२४ जागा सोडण्यात आल्या असून १४४ जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत. शिवसेनेला १२४ जागा सोडल्यामुळे उरलेल्या १४४ जागांमध्येच भाजप आणि मित्रपत्रांना जागा वाटून घ्याव्या लागणार आहेत.

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -