घरमनोरंजनबॉलिवूडच्या किंग खानची हुबेहूब कॉपी बघून तुम्हीही व्हाल थक्क

बॉलिवूडच्या किंग खानची हुबेहूब कॉपी बघून तुम्हीही व्हाल थक्क

Subscribe

हे व्हायरल होणारे फोटो बघितले तर तुम्ही देखील व्हाल थक्क

बॉलिवूड विश्वात गेल्या दशकांपासून अधिराज्य गाजवणाऱ्या किंग खान म्हणजे शहारूख खानने जेव्हा पासून बॉलिवूड क्षेत्रात पदार्पण केले तेव्हापासूनच सामान्य लोकं देखील त्याचे चाहते झाले आहे. शहारूख खानचे चाहते त्याच्या कपड्यांपासून ते हेअर स्टाईलपर्यंत हुबेहूब कॉपी करतांना दिसत आहेत. यामध्ये काहींनी त्याचे दिसणं, चालणं पुर्णपणे आत्मसात करण्याचा प्रयत्न केला मात्र ते पुर्णतः नक्कल करू शकले नाहीत.

- Advertisement -

मात्र, सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत असून त्याची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. या व्हायरल होणाऱ्या फोटोतील व्यक्ती सेम-टू-सेम अभिनेता, किंग खान शहारूख खान सारखा दिसतोय.

- Advertisement -

नुकताच विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये शहारूख खान सारखा दिसतोय. या व्यक्तीला तुम्ही वरवर बघितले तर तुम्ही त्याला ओळखूच शकणार नाही. परंतु, हा खराखुरा किंग खान नसून त्याच्या सारखा दिसणारा मिळता जूळता चेहरा आहे. हा व्हायरल होणारा फोटो आणि त्या फोटोतील चेहरा खरच थक्क करणारा आहे. हा व्यक्ती जॉर्डन बेस्ट फोटोग्राफर आहे, असे समजतेय.

या व्हायरल होणाऱ्या सेम-टू-सेम शहारूख खानचे नेटकऱ्यांनी चांगलेच कौतुक केले आहे. हा फोटो पाहून अनेकांनी त्याला ‘फॅन २’ मध्ये काम करू शकतो. असे देखील मजेत सुचवले तर काहीनी या व्यक्तीला शहारूख खानची ‘सस्ती कॉपी’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. या व्यक्तीला सेलिब्रिटीसारखे फोटोशूट करायची आवड आहे. तुम्ही देखील हे व्हायरल होणारे फोटो बघितले तर तुम्ही थक्क होऊन त्याला शहारूख खानच समजाल…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -