घरमहाराष्ट्रशिवसेना विरोधातील 'ते' वक्तव्य भोवलं; हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल

शिवसेना विरोधातील ‘ते’ वक्तव्य भोवलं; हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल

Subscribe

कन्नड मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी एका प्रचारसभेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्य शब्दांमध्ये टीका केली होती. त्यांच्या याच टीकेमुळे त्यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यावर आली आहे. सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. या प्रचारामध्ये काही नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र, या आरोप-प्रत्यारोपाच्या कुरघोड्यांमध्ये काही मंडळी वाहत जाऊन अत्यंत खालच्या थरापर्यंत टीका करत असल्याचं समोर आलं आहे. कन्नड मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी एका प्रचारसभेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्य शब्दांमध्ये टीका केली होती. त्यांच्या याच टीकेमुळे त्यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्यात हर्षवर्धन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर मध्यरात्री हल्ला, शिवसैनिकांवर संशय

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले होते हर्षवर्धन जाधव?

‘हा हरामखोर हर्षा, याच्यामुळे मुसलमान लोकसभेला निवडून आला. हे शिवसेनेचं भाषण आहे. त्यांच्याकडे दुसरं काही भाषण नाही. आमचा उमेदवार असं करतो, तसं करतो, हे नाही. आमच्या खासदाराने पंचवीस वर्षात काय केलं? हे नाही. आमच्या उमेदवाराला किती अक्कल आहे? तो ट्रॅफीक पोलिसला फोन करू शकतो की नाही? हे नाही. तर काय? हर्षामुळे मुसलमान आला ना निवडून! आहो तुम्ही येडे झाले का? त्याला कुठे मतदान करू ऱ्हायले? हे शिवसेनेचे भाषण राहणार आहे उद्या. केलंच तसं भाषण त्यांनी परवा, उद्धव ठाकरेंनी! हिरवा वरती चढवला, भगवा खाली आला. मी त्यांना एक प्रश्न विचारतो, विधानसभेतही विचारतो आणि तुमच्या समक्षही शिवसैनिकांना विचारतो. एव्हढंच तुम्हाला मुसलमानांच्याबद्दल वावडे आहे, तर सत्तार तुमचा कोण लागतो? कोण लागतो सत्तार तुमचा? पाहुणा आहे? चुलता आहे? हमारे अब्दुल भाई अभी अभी शिवसेना में आये है’, असे हर्षवर्धन जाधव आपल्या भाषणात म्हणाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -