घरमुंबई'मोदी-फडणवीस आम्ही केलेल्या कामांची उद्घाटनं करत डंका पिटत आहेत'

‘मोदी-फडणवीस आम्ही केलेल्या कामांची उद्घाटनं करत डंका पिटत आहेत’

Subscribe

नवाब मलिक यांनी घेतला मोदी-फडणवीस यांचा जोरदार समाचार

देशात मोदी आणि राज्यात फडणवीस आम्ही केलेल्या कामांची उद्घाटनं करत विकासकामांचा डंका पिटत असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. निवडणुका जवळ आल्यावर केंद्र आणि राज्य सरकार मोठमोठ्या जाहिराती आणि विकासकामांची उद्घाटने करून विकास आम्हीच करत आहे, असे सांगत याचा जोरदार समाचार नवाब मलिक यांनी घेतला आहे.


हेही वाचा – ज्या गुफेत मोदींनी ध्यान केले होते ‘ती’ गुफा; ऑक्टोबरपर्यंत हाऊसफुल!

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक विकासकामे केली जात असल्याचा दावा केला आहे, त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ‘पियुष गोयल हे मुंबईचे आहेत. पावसामध्ये रेल्वेची काय हालत झाली होती याचा अनुभव मुंबईकरांनी घेतला आहे. पियुष गोयल महाराष्ट्रात ४० टक्के विकास होत असल्याचे बोलत आहेत. परंतु ट्वीटर, सोशल मिडिया यावरुन सरकार किंवा व्यवस्था चालवली जात नाही हे लक्षात घ्या’, असेही नवाब मलिक म्हणाले.

- Advertisement -

यावेळी नवाब मलिक यांनी सांगितले की, ‘एकही नवीन योजना या सरकारची नाही. आमच्या सरकारने सुरु केलेल्या आणि अपुर्ण राहिलेल्या कामांची फित कापत आमच्या कामांचे श्रेय घेतले जात आहे.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -