घरमुंबईजोगेश्‍वरीत लवकरच उभारणार भव्य राष्ट्रध्वज

जोगेश्‍वरीत लवकरच उभारणार भव्य राष्ट्रध्वज

Subscribe

जोगेश्‍वरीतील शामनगर येथील तलावाजवळ लवकरच भव्य राष्ट्रध्वज उभारणार असल्याची माहिती गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून दिली आहे.

जोगेश्‍वरीच्या सौंदर्यात लवकरच भर पडणार आहे. देशाच्या अस्मितेचे प्रतिक असलेला असा भव्य राष्ट्रध्वज जोगेश्वरीच्या शामनगर येथील लोकमान्य टिळक गणेश विसर्जन तलावाजवळ उभारण्यात येणार आहे. हा राष्ट्रध्वज उभारण्यासाठी गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी महापालिका आयुक्त यांना पत्र पाठविले आहे. जोगेश्‍वरीतील विविध पर्यटनस्थळांपैकी एक म्हणजे लोकमान्य टिळक गणेश विसर्जन तलाव. हे स्थळ पुरातन असून या ठिकाणी श्री गणेश विसर्जनाचा तलाव आहे. ही वास्तु पुरातन असल्याने या जागेचे सुशोभिकरण प्रशासन आणि शासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यामुळे हे स्थळ मुंबई उपनगरातील प्रेक्षणीयस्थळांपैकी एक स्थळ बनले आहे. या तलावाला लागूनच भक्तांच्या हाकेला धावणारा ‘श्री इच्छापूर्ती गणेशा’चे मंदिर असल्याने येथे मोठ्या प्रमाणात भक्त या मंदिर आणि तलाव परिसरात येतात. या स्थळाला भेट देणार्‍या पर्यटकांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे.

याअगोदर ‘या’ भागांमध्ये उभारण्यात आला आहे राष्ट्रध्वज

याअगोदरच वांद्रे वरळी सि लिंक, वरळी तसेच मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुल येथे भव्य राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे. काही दिवसांपुर्वी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून रविंद्र वायकर यांनी जिल्ह्याधिकारी कार्यालयात उभारण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचे उद्घाटनही केले. अशाच प्रकारचा राष्ट्रध्वज सामाजिक निधीच्या (सीएसआर) माध्यमातून आपल्या विधानसभा क्षेत्रातील उभारण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. या राष्ट्रध्वजाचा सभोवतालचा परिसर सौंदर्यीकरचे काम ते आपल्या आमदार निधीतून करणार आहेत. या कामास तातडीने परवानगी मिळावी यासाठी वायकर यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांना पत्र पठविले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सुप्रिया सुळेंशी गैरवर्तवणूक करणाऱ्या टॅक्सी चालकाला अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -