घरमहाराष्ट्रमहाजनादेश यात्रेदरम्यान महिलेने मुख्यमंत्र्यांच्या दिशेला फेकली शाई

महाजनादेश यात्रेदरम्यान महिलेने मुख्यमंत्र्यांच्या दिशेला फेकली शाई

Subscribe

अकोला येथील महाजनादेश यात्रेत एका महिलेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिशेला शाई फेकली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भाजपची महाजनादेश यात्रा आता तिसऱ्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे. दरम्यान, शुक्रावीर सकाळी अकोला येथे महाजनादेश यात्रा आली असता एका महिलेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिशेला शाई फेकली. शाई फेकणाऱ्या महिला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्या आहेत. त्यांचे नाव शर्मिला येवले असून त्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अंगावर शाही फेकण्याचा डाव त्यांचा होता. मात्र, पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. याअगोदर जालना येथील सभेतही या महिलेने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो प्रयत्नही पोलिसांनी हाणून पाडला होता.

विरोधकांवर पुन्हा बरसले मुख्यमंत्री

अकोला येथील सुगाव शिवारात रोकडोबा मंदिराजवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली. याशिवाय विधानसभेत विरोधीपक्ष नेतेपदाची खुर्ची टिकवण्यापुरते तरी राजकारण करावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्याचबरोबर ‘राज्य सरकारने २० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दिले. आधीच्या सरकारने फक्त १२ हजार कोटी रुपये दिले होते. त्यामुळे ही तफावत लक्षात घेऊन शेतकऱ्यांचे खरे कैवारी कोण? हे लक्षात घ्या’, असे मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – सुप्रिया सुळेंशी गैरवर्तवणूक करणाऱ्या टॅक्सी चालकाला अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -