घरमुंबईसुप्रिया सुळेंशी गैरवर्तवणूक करणाऱ्या 'त्या' टॅक्सी चालकाला अटक

सुप्रिया सुळेंशी गैरवर्तवणूक करणाऱ्या ‘त्या’ टॅक्सी चालकाला अटक

Subscribe

गुरुवारी दादर स्थानकावर एका टॅक्सीचालकाने सुप्रिया सुळे यांच्याशी गैरवर्तवणूक केले होते. सुळे यांनी याबाबत ट्विटरमार्फत रेल्वे मंत्र्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने या तक्रारीची गंभीर दखल घेत टॅक्सी चालकाला अटक केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत गुरुवारी दादर स्थानकावर एका टॅक्सी चालकाने गैरवर्तवणूक केले. या टॅक्सी चालकाची तक्रार सुप्रिया सुळे यांनी ट्विटमार्फत केली. प्रशासनाने त्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत त्या टॅक्सी चालकाला अटक केली आहे. या टॅक्सी चालकाचे नाव कुलजीतसिंह मल्होत्रा असे आहे. त्याचबरोबर विनातिकीट रेल्वे स्थानकावर आल्यामुळे या टॅक्सी चालकाला कारवाईदरम्यान २६ रुपयांचा दंड भरावा लागला. या टॅक्सी चालाकाकडे परवाना नव्हता, याशिवाय त्याने युनिफॉर्मही परिधान केलेले नव्हते. त्यामुळे माटुंगा वाहतूक पोलिसांनी त्याला ६०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याचबरोबर भारतीय रेल्वे कायद्याअंतर्गत टॅक्सी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आले. सध्या त्याची रवानगी आरपीएफ कोठडीत करण्यात आली असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.

हेही वाचा – शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याने जालन्यात आमदारांना अटक

- Advertisement -

काय आहे नेमके प्रकरण?

सुप्रिया सुळे गुरुवारी देवनागरी एक्सप्रेसमार्फत मुंबईत आल्या. मुंबईत दादर स्थानकावर रेल्वे थांबत असताना टॅक्सी चालक कुलजीतसिंह मल्होत्रा गाडीत शिरला. यावेळी तो प्रवाशांसोबत भाड्यासाठी हुज्जत घालू लागला. त्याने सुप्रीया सुळेंना कुठे जायचे? असे विचारले. सुप्रिया सुळे यांनी त्याला कुठेही जायचे नसल्याचे सांगितले. तरीही तो सुप्रिया यांच्या मागे लागला. त्यांनी दोन वेळा नकार दिला. तरीही तो टॅक्सी चालक सुप्रिया यांच्या पुढे उभा राहिला आणि त्याने रस्ता आडवण्याचा प्रयत्न केला. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर थेट मोबाईल काढून सेल्फी घेऊ लागला. सुप्रिया सुळे यांनी स्वत: याबात ट्विटरमार्फत रेल्वे मंत्र्यांकडे तक्रार केली. रेल्वे प्रशासनाने त्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत टॅक्सी चालकावर कारवाई केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -