घरमुंबईउद्या चंद्रकांत पाटील यांच्यासोबत राज्यपालांची भेट घेणार - सुधीर मुनगंटीवार

उद्या चंद्रकांत पाटील यांच्यासोबत राज्यपालांची भेट घेणार – सुधीर मुनगंटीवार

Subscribe

भाजपच्या कोअर कमिटीची मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या निवडीसोबतच राज्यातल्या सत्तास्थापनेविषयी चर्चा झाली. या बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर भाजपची भूमिका स्पष्ट केली. ‘शिवसेना, भाजप महायुतीला जनादेश आलेला आहे. पहिल्या दिवसापासून या जनादेशाचा सन्मान व्हावा, ही भाजपची ठाम भूमिका आहे. आता आम्ही निर्णय घेतला आहे की महायुतीचं सरकार आणण्यासाठीच आमची पुढची पावलं पडणार आहेत. उद्या मी आणि चंद्रकांत पाटील राज्यपालांना भेटायला जाणार आहोत. कोणत्याही क्षणी गोड बातमी येईल. महाराष्ट्रात कुणीही चिंता करण्याचं कारण नाही’, असं सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले. ‘सत्तास्थापनेविषयी सुरू असलेल्या प्रक्रियेविषयी राज्यपालांना आम्ही माहिती देणार आहोत’, असं देखील मुनगंटीवार यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -