घरमुंबईसेनेचे ‘ठाणे’ कुणाकडे.. भाजप की शिवसेना !

सेनेचे ‘ठाणे’ कुणाकडे.. भाजप की शिवसेना !

Subscribe

ठाणे शहर विधानसभा मतदार संघ

ठाण्याच हार्ट म्हणून ओळखले जाणारा ठाणे शहर विधानसभा मतदार संघ हे शिवसेनेचा भक्क्म बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो. पण २०१४ च्या निवडणुकीत सेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडीत भाजपचे कमळ फुलले. भाजपचे संजय केळकर हे आमदार म्हणून निवडून आले. शिवसेनेला हा घाव जिव्हारी लागला आहे. पण आता शिवसेनेने या मतदार संघावर दावा केला आहे. भाजपने हा मतदार संघ शिवसेनेला सोडावा अशी सेनेच्या स्थानिक नेतेमंडळींची मागणी आहे. मात्र मतदार संघ सेाडण्यास भाजप तयार नाही. युतीबाबत अजूनही संदिग्धता आहे. त्यामुळे कार्यकत्यांनी वेट अ‍ॅण्ड वॉच ची भूमिका घेतली आहे. त्यामुळे जागावाटपात हा मतदार संघ कुणाकडे येतो याचीच खरी उत्सुकता आहे.

ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंपासून ते आनंद दिघे यांनी शिवसेनेचा प्रचार प्रसार येथूनच केला. १९९० पासून ते २००९ पर्यंतच्या काळात केवळ शिवसेनेचा आमदार निवडून आला आहे. २००९ ला या मतदार संघाचे विभाजन झाले आणि केवळ जुने ठाणे या मतदार संघात ठेवले गेले. २०१४ च्या निवडणुकीत मित्रपक्ष असलेल्या भाजपनेच सेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले. भाजपचे संजय केळकर हे १२ हजार ५८८ मतांनी विजयी झाले होते. बालेकिल्ला हातातून निसटल्याने हा घाव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे शिवसेनेने या मतदार संघावर दावा केला आहे.

- Advertisement -

शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के, सेनेचे नेते अनंत तरे,कै. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्यासह अनेकजण इच्छूक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन डावखरे, नारायण पवार ही मंडळी भाजपमध्ये दाखल झाली आहेत. भाजपमध्ये अनेकजण इच्छूक आहेत. मात्र विद्यमान आमदार संजय केळकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीत भाजपचे नगरसेवक निवडून आले आहेत, त्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट रवींद्र आंग्रे अनेक दिवसांपासून तयारी सुरू असून काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छूक आहेत.

तसेच मनसेही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची जोरदार तयारी केली आहे. मनसेकडून ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे उमेदवार असू शकतात. मात्र, भाजप शिवसेनेसाठी हा मतदार संघ सोडेल का ? हाच खरा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे युतीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. मात्र युती न झाल्यास शिवसेनेने मैदानात उतरण्याची जोरदार तयारी केली आहे. शिवसेनेचा हा पारंपरिक मतदार संघ असला तरी २०१४ च्या निवडणुकीत भाजपने वर्चस्व वाढवले, त्यामुळे वाटाघाटीत हा मतदारसंघ कोणाकडे जातो याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे सध्या तरी कार्यकत्यांमध्ये वेट अ‍ॅण्ड वॉच भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

२०१४ चा निकाल

संजय केळकर (भाजप) – ७० हजार ८८४
रवींद्र फाटक (शिवसेना) – ५८ हजार २९६
निरंजन डावखरे (राष्ट्रवादी) – २४ हजार ३२०

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -