घरमहाराष्ट्रआयाराम उमेदवारांना भाजपत 10 टक्के जागा

आयाराम उमेदवारांना भाजपत 10 टक्के जागा

Subscribe

भाजपमध्ये नव्याने मोठ्या प्रमाणात प्रवेश होत असल्याने जुन्या कार्यकर्त्यांना न्याय मिळणार का, असा प्रश्न विचारला जातो आहे. परंतु, या विधानसभा निवडणुकीत केवळ 10 टक्केे जागांवरच नव्याने पक्षात येणार्‍यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. उर्वरित जागांवर जुन्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले.

येथे मंगळवारी (२४ सप्टेंबर) भाजप उत्तर महाराष्ट्रस्तरीय कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी संघटनमंत्री विजयराव पुराणिक, बेटी बचाव अभियानप्रमुख डॉ.राजेंद्र फडके, खासदार डॉ.सुभाष भामरे, पर्यटन व रोहयोमंत्री जयकुमार रावल, माजीमंत्री एकनाथ खडसे, माजी मंत्री आमदार विजयकुमार गावित, खासदार डॉ.हिना गावित, डॉ. भारती पवार, आमदार उदेसिंग पाडवी, हरीभाऊ जावळे, संजय सावकारे, स्मिता वाघ, खासदार उन्मेश पाटील, रक्षा खडसे, आमदार देवयानी फरांदे, लक्षमण सावजी, अ‍ॅड. किशोर काळकर, जिल्हाप्रमुख अनुप अग्रवाल व बबन चौधरी, हिरामण गवळी उपस्थित होते. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रुसवे फुगवे न ठेवता कामास लागण्याचे आवाहन यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी तथा खासदार भुपेंद्र यादव यांनी केले. भाजप योग्य उमेदवारांनाच संधी देणार असल्याचे रावल यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

गिरीश महाजन यांनी उत्तर महाराष्ट्रातून 42 पेक्षा जास्त आमदार होतील, असा दावा केला. या आकडेवारीवर काँग्रेस व राष्ट्रवादी ईव्हीएम मशीनचे रडगाणे गाणार आहे. पण हा दावा आपण कार्यकर्त्यांच्या परिश्रमावर विश्वास असल्याने करीत असल्याचा उच्चार त्यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -