घरमुंबईवरळीत घडलंय बिघडलंय

वरळीत घडलंय बिघडलंय

Subscribe

कॉर्पोरेट हब,व्यावसायिक इमारतींचे जाळे लाभलेला , मराठी भाषिकांचे प्राबल्य आणि पुर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळपासून मतदारांनी केंद्रावर तुरळक प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असलेल्या या मतदारसंघात सकाळच्या सत्रात मतदार मात्र तेवढ्या संख्येने मतदानासाठी उतरले नव्हते. मात्र, सकाळपासून आदित्य ठाकरे हे या मतदारसंघात तळ ठोकून बसले असल्याने येथील कार्यकर्त्यांमधील प्रचंड उत्साह दिसून येत होता.

वरळी विधानसभा मतदारसंघावर सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. उमेदवारांच्या नावाच्या घोषणेपासून ते निवडणुकीच्या दिवसापर्यंत वरळी विधानसभा मतदार संघ सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरला होता. कारण ठाकरे घराण्यातील पहिला ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. इतकेच नव्हे तर बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले याने देखील निवडणूक प्रचारादरम्यान चांगला टीआरपी मिळवला होता.

- Advertisement -

परंतु,निवडणुकीच्या दिवशी या मतदार संघातील अपक्ष उमेदवार बिचुकलेही वरळीत नव्हते. तर इतर उमेदवार सुध्दा दिवसभर दिसून आले नाहीत. आदित्य ठाकरे मात्र दिवसभर ठाण मांडून बसले होते. वांद्रे येथे आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी थेट वरळी गाठली. त्यानंतर कार्यकर्त्यांबरोबर आढावा घेत त्यांनी निवडणुकीवर देखरेख ठेवण्यास सुरुवात केली होती.परंतु,या सर्वाला गालबोट लागले ते ईव्हीएमच्या गोंधळाने. वरळीतील बीडीडी चाळ क्रमांक ५२ मधल्या ६२ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी इव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला होता. या 62 मतदान केंद्रावरच्या बुथमधील इव्हीएम मशीन तब्बल 6 वेळा बंद पडल्यामुळे अनेकांना मतदानाच्या रांगेत ताटकळत उभे राहावे लागले.

यंदा पाच टक्क्यांनी मतदान घसरले                                                                                           सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत वरळी विधानसभा मतदार संघात 4. 94 टक्के मतदान झाले होते. तर दुपारी 1 ते 3 या दरम्यान, 35 टक्के मतदान झाले आहे. गेल्या विधानसभात निवडणुकीपेक्षा यंदाच्या विधानसभात वरळी विधानसभा क्षेत्रात टक्का घसरण्याची शक्यता होती. पण अखेर ६ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार याठिकाणी ४३.८२ टक्के मतदान झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -