घरमुंबई'मतदार राजा जागा हो... लोकशाहीचा धागा हो...', पथनाट्यातून जनजागृती

‘मतदार राजा जागा हो… लोकशाहीचा धागा हो…’, पथनाट्यातून जनजागृती

Subscribe

मुंबई शहरजिल्ह्यांतर्गत होत असलेल्या विधानसभा निवडणूकीत महाविद्यालयीन विद्यार्थांचा सहभाग महत्वाचा आहे. विशेषत: विद्यार्थींनींनी आपल्या घरातील सर्व पात्र मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे ज्यामुळे आपल्या जिल्ह्याची मतदान टक्केवारी अधिक वाढेल असे आवाहन निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्कच्या प्राचार्या डॉ. गीता इब्राहीम यांनी आज येथे केले. मरीन लाईन्स येथील निर्मल निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क येथे आयोजित मतदार जनजागृतीच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी ‘मतदार राजा जागा हो… लोकशाहीचा धागा हो…’, या पथनाट्याद्वारे मतदानाची जनजागृती करुन ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्याची उपस्थित विद्यार्थिंनीनी मोठ्या उत्सुकतेने पाहणी केली.

या कार्यक्रमास निर्मला निकेतनच्या सचिव श्रीमती नोईला दिसा, मुंबई शहर जिल्हा प्रसारमाध्यम कक्ष समन्वयक डॉ.राजू पाटोदकर आदी उपस्थित होते. विद्यार्थीनींनी आपल्या भागात अधिकाधिक मतदान होण्यासाठी मतदानाचा प्रसार करावाच तसेच त्यांनी नवमतदारांना देखील प्रोत्साहीत करावे असेही प्राचार्यानीं यावेळी सांगितले. मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत करण्यात येणाऱ्या मतदान जनजागृती विषयक मोहिमेची सविस्तर माहिती डॉ. पाटोदकर यांनी उपस्थितांना दिली. तसेच युवा मतदारांनी मतदानाच्या प्रक्रियेत उत्साहाने सहभाग घेवून २१ ऑक्टोबर रोजी मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले. मुंबई शहर जिल्हयांतर्गत असलेल्या १० विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक तथा मतदान विषयक जनजागृती मोहिम सुरु असून विविध मतदारसंघात ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट चे प्रात्याक्षिक दाखविण्यात येत आहे. नागरिकांचा उत्साही प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास प्राध्यापक डॉ. विशाखा कर्णाड, फातिमा केदार, शितल जोशी, कुलाबा मतदारसंघातील अशोक गुरव निवडणूक कर्मचारी तसेच ज्ञानेश्वर पवार, सुशिल वळंजू इ. कर्मचारी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

- Advertisement -

हेही वाचा –

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची पहिली यादी जाहीर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -