घरमहाराष्ट्रविधानसभा निवडणुकीसाठी मनसेची पहिली यादी जाहीर

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची पहिली यादी जाहीर

Subscribe

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची पहिली यादी जाहीर झाली आहे. या पहिली यादीत २७ उमेदवारांची नावे घोषित  करण्यात आली आहेत. यामध्ये मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना माहिम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ठाणे विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. यासोबतच कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी राजू पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्याचबरोबर अखिल चित्रे यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. मंगळवारी संध्याकाळी मनसेचे नेते शिरीष सावंत यांनी ही यादी जाहीर केली आहे.

ईडीकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चौकशी झाल्यानंतर मनसे विधानसभा निवडणूक लढवणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला होता. याशिवाय विधानसभा निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावरुन पक्षातच दोन गट पडले होते. त्यामुळे मनसे निवडणूक लढवणार की नाही? असा प्रश्न कार्यकर्त्यांनाही पडला होता. मात्र, शुक्रवारी मनसेच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली आणि त्या बैठकीत निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यामुळे मनसे विधानसभा निवडणुकीत १०० जागांवर निवडणूक लढवणार, अशी चर्चा सुरु आहे. दरम्यान, मनसेने मंगळवारी संध्याकाळी २७ उमेदवारांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे यात मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांचे नाव नाही. दरम्यान, नांदगावकर उमेदवारीसाठी इच्छुक नसल्यामुळे त्यांचे नाव नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -