घरमुंबईपनवेलसह उरण आणि नवी मुंबईमध्ये मतदानाचा टक्का घसरला

पनवेलसह उरण आणि नवी मुंबईमध्ये मतदानाचा टक्का घसरला

Subscribe

दुपारी १ वाजेपर्यंत नवी मुंबई आणि पनवेलमध्ये मतदानाची टक्केवारी घसरली असल्याचे चित्र होते.

राज्यात १४ व्या विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका पार पडत असताना मतदानाचा टक्का मात्र घसरल्याचे पाहावयास मिळत आहे. यंदाच्या निवडणुकीत दुपारी एक वाजेपर्यंत नवी मुंबईतल्या बेलापूरमध्ये २५ टक्के, ऐरोली मतदारसंघात २३ टक्के मतदान झाले आहे. तर पनवेल विधानसभेसाठी दुपारी एकपर्यंत २८.२५ टक्के मतदान झाले आहे. उरण मतदारसंघामध्ये ३४.९४ टक्के मतदान झाले आहे.

दोन आठवड्यांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना जनतेमधून सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली जात होती. याचा प्रत्यय विधानसभेच्या निवडणुकीवर मोठ्या प्रमाणावर झालेला दिसून येत आहे. एरव्ही दुपारपर्यंत ५० टक्के मतदानाचा आकडा पूर्ण होत होता, किंबहुना त्याच्या जवळपास दिसायचा. मात्र या निवडणुकीतील जनतेचा सत्ताधारी पक्षाबाबत असलेला रोष मतदानावर बहिष्कार टाकून दिसत आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. त्यातच पनवेल विधानसभा क्षेत्रातील भाजपच्या पारड्यातील निर्णायक मते “पाणी नाही तर मत नाही: असा नारा देत मतदानावर बहिष्कार टाकत आहेत. याचा मोठा फटका प्रशांत ठाकूर यांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांच्या निवडणुकीत पहिल्यांदाच इतक्या कमी प्रमाणात मतदान करताना नागरिक दिसत आहेत.

- Advertisement -

पनवेल विधानसभा क्षेत्रातील काळुंद्रे येथूल बूथ क्र. ५४२ आणि खैरवाडी येथील बूथ क्र. १६३ येथील व्होटिंग मशीन सकाळी अचानक बंद पडल्यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता, मात्र अर्ध्या तासाच्या फरकाने याठिकाणी नव्या मशीनची व्यवस्था करण्यात आली.

मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत असताना आपल्या घरामध्ये चुलत्यांचे अचानक निधन झाले. मात्र निवडणूक कर्तव्यावर आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याकडे पनवेलमधील कर्मचारी संदीप रोडे यांनी प्रथम प्राधान्य दिले. यावरून आपल्या घरात दुःखद प्रसंग आल्यानंतर अधिकारी मात्र कर्तव्यासोबत आपले परिवार संभाळण्याकडे कल देतात आणि कर्मचारी आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून वेळ मारून नेतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -