एसबीआय बँकेत कॅश जमा करण्यासाठी ५६ रुपये मोजा!

बँकेच्या सर्कुलरप्रमाणे १ ऑक्टोबर पासून एका महिन्यात फक्त तीन वेळा मोफत पैसे जमा करता येणार आहेत.

Mumbai
state bank of india
स्टेट बँक ऑफ इंडिया

भारतीय स्टेट बँकेने बँक चार्ज आणि ट्रान्झेक्शनच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार १ ऑक्टोबरपासून बँकेच्या सर्व्हिस चार्जमध्ये बदल होणार आहेत. नवीन नियमांनुसार बँकेत रुपये जमा करणे, काढणे, चेक वापरणे, एटीएम ट्रांझेक्शन यासंबंधित सर्व्हिस चार्जमध्ये बदल करण्यात आले आहेत. बँकेच्या सर्कुलरप्रमाणे १ ऑक्टोबर पासून एका महिन्यात फक्त तीन वेळा मोफत पैसे जमा करता येणार आहेत. त्यानंतर खात्यात पैसे जमा करण्यासाठी ५० रुपये (जीएसटी अतिरिक्त) चार्ज भरावा लागणार आहे. पाचवी किंवा त्यानंतर रक्कम जमा करण्यासाठी ५६ रुपये मोजावे लागणार आहेत.

नव्या नियमानुसार हे बदल झालेत

एखाद्या कारणामुळे चेक बाऊंस झाल्यास चेक जारी करणाऱ्यावर १५० रुपये (जीएसटी अतिरिक्त) भरावे लागणार आहेत. तर जीएसटीसह १६८ रुपये चार्ज भरावा लागेल. नव्या नियमावलीत बँकेने एटीएमद्वारे होणाऱ्या ट्रान्झेक्शनची संख्या वाढवली आहे. पण बँकेच्या शाखेत जाऊन एनईएफटी आणि आरटीजीएस करणे महागाईचे ठरणार आहे.

एटीएममधून दहा वेळा ट्रान्झेक्शनची मुभा

बँकेने जारी केलेल्या सर्कुलर मध्ये देशातील मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबाद या शहरांमध्ये बँकेच्या एटीएममधून लोकांना दर महिन्याला १० वेळा ट्रान्झेक्शन करता येणार आहे. तर इतर शहरांमध्ये १२ वेळा ट्रान्झेक्शनची मुभा देण्यात आली आहे. दुसऱ्या बँकेचे एटीएम वापरणाऱ्या ग्राहकाला ५ ट्रान्झेक्शनची सुविधा देण्यात आली आहे.

हेही वाचा – पाहा – करिनाच्या लाडक्या तैमुरने असा साजरा केला गणेशोत्सव!

या नियमांमध्येही बदल

२५ हजारांपेक्षा अधिक मिनिमम एव्हरेज बॅलेन्स ठेवणाऱ्या ग्राहकांना बँक एटीएमचा वापर अमर्याद केला जाणार आहे. तर यापेक्षा कमी एव्हरेज बॅलेन्स ठेवणाऱ्या खातेधारकांना आठ मोफत ट्रान्झेक्शन करता येणार आहेत. सॅलरी खातेधारकांना देशातील कोणत्याही बँक आणि एसबीआयचे एटीएम वापरल्यास कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.