ट्रम्प यांच्या पत्नीचा ‘हा’ किसींग फोटो व्हायरल; पण किस केलं कुणाला!

Mumbai
Viral picture of Justin Trudeau and Melania Trump from G7 Summit creates meme fest. Here's why
ट्रम्प यांच्या पत्नीचा 'हा' किसींग फोटो व्हायरल; पण किस केलं कुणाला!

फ्रान्समध्ये नुकतंच जी-७ किंवा ग्रुप ऑफ सेव्हन ही परिषद पार पडली. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देखील सहभाग होता. या परिषदेत भारत आणि पाकिस्तान मधल्या काश्मीर प्रश्नासंबंधी तिसऱ्या देशला मध्यस्थी करण्याची आमची इच्छा नाही, असं मोदी नमूद केलं होतं. तसेच पर्यावरण रक्षणाच्या उपायोजनांचे मोदींनी या परिषदेत सादरीकरण केलं होतं, अशा बऱ्याच गोष्टी घडल्या. पण या परिषदेच्या दरम्यानचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर या फोटोचे मीम्स देखील व्हायरल होत असून जगभरात खळबळ उडाली आहे.

हा फोटो आहे अमेरिकेची पहिली महिला मेलानिया ट्रम्प आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांचा. हा फोटो रविवारी संध्याकाळच्या वेळेस जेव्हा देशातील सर्व नेते मंडळी आपल्या कुटुंबासह फोटो काढत होते. त्याच दरम्यान अमेरिकेची पहिली महिला मेलानिया ट्रम्प या कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांची किस घेताना या फोटोत दिसून येत आहे. पण त्याचवेळी मेलानिया यांचे पती आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या शेजारी डोळे बंद करून उभे आहेत.

या फोटोमुळे नेटकऱ्यांमध्ये असलेल्या क्रिएटिव्हिटीला उधाण मिळाले आहे. सोशल मीडियावर या फोटोच्या मीम्सचा वर्षाव सुरू झाला. तर पाहुयात हे व्हायरल झालेले मीम्स

यापूर्वी देखील जी-७ या परिषदेतील एक फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो डोनाल्ड ट्रम्प आणि जर्मनीच्या चांसलर अँजेला मर्केल यांच्या होता.