Saturday, August 8, 2020
Mumbai
28.6 C
घर CORONA UPDATE Corona Update: मुंबईत २४ तासांत १,०५९ नवे रूग्ण; ८३२ जणांना डिस्चार्ज

Corona Update: मुंबईत २४ तासांत १,०५९ नवे रूग्ण; ८३२ जणांना डिस्चार्ज

आतापर्यंत ८७ हजार ९०६ रुग्ण कोरोनामुक्त

Mumbai
mumbai corona cases update

मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ०५९ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ४५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १५ हजार ३४६ वर पोहोचली असून आतापर्यंत यापैकी ६ हजार ३९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच २४ तासांत ८३२ रुग्ण बरे होऊन गेले असून आतापर्यंत ८७ हजार ९०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

आज मुंबईत ९१० संशयीत रुग्ण भरती झाले असून आतापर्यंत संशयीत रुग्ण भरती होण्याची संख्या ८१ हजार ६३६ वर पोहोचली आहे. सध्या मुंबईत २० हजार ७४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी २५ रुग्ण पुरुष आणि २० रुग्ण महिला होत्या. तसेच ३७ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी १ जणांचे वय ४० वर्षा खाली होते, ३३ जणांचे वय ६० वर्षा वर होते, तर उर्वरित ११ रुग्ण ४० ते ६० वर्षा दरम्यान होते.

मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६ टक्के एवढे आहे. ३१ जुलैपर्यंत मुंबईत ५ लाख ३७ हजार ५३६ कोविड-१९च्या चाचण्या झाल्या आहेत, असे सांगितले जात आहे.


Corona Update: राज्यात आज दिवसभरात ९,६०१ नव्या रुग्णांची नोंद; ३२२ जणांचा मृत्यू

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here