घरमुंबई'या' कारणामुळे औषधी दूकानांचे परवाने रद्द

‘या’ कारणामुळे औषधी दूकानांचे परवाने रद्द

Subscribe

अन्न व औषध विभागाने केली कारवाई.

चुकीच्या औषध विकणाऱ्या मालाड परिसातील दुकानदारांवर अन्न व औषध विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत त्यांचा परवाना कायमचा रद्द करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी ही कारवाई केली. डॉक्टरांनी सांगितलेल्या फॉलीमॅक्स या व्हिटामीन औषधाऐवजी कॅन्सरवर उपचारासाठी वापरले जाणारे फॉलीट्रॅक्स हे औषध फार्मसिस्टच्या गैरहजेरीत रुग्णाला देण्यात आले होते. या घटनेत रुग्णाचा मृत्यू ओढवला होता. त्यामुळे, यावर राज्य शासनाने गंभीर दखल घेत ही कारवाई केली.

चुकीच्या औषधामुळे रुग्णाचा झाला मृत्यू

मुंबईतील दिगंबर धुरी यांना डॉक्टरांनी फॉलीमॅक्स औषध घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्या ऐवजी फॉलीट्रॅक्स हे चुकीचं औषध मालाडच्या कल्पेश मेडिकलकडून रुग्णाला देण्यात आलं होतं. औषधाच्या ब्रॅण्डच्या नावातील सुक्ष्म वेगळेपण लक्षात न आल्याने व्हिटॅमिन औषधाऐवजी कर्करोगाच्या उपचारावरील औषध दिले गेल्याने फॉलीट्रॅक्स या औषधाच्या दुष्परिणामामुळे धुरी यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांची पत्नी आशा धूरी यांनी पोलीसांकडे तक्रार केली. अन्न व औषध प्रशासनाकडेही याची तक्रार नोंदवण्यात आली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत औषध विक्री करणाऱ्याचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

- Advertisement -

तपासणीत आढळल्या त्रुटी

औषध निरिक्षकांनी केलेल्या तपासात काही ठळक त्रुटी आढळून आल्या होत्या. यात रजिस्टर्ड फार्मसिस्टच्या गैरहजेरीत श्येड्युल एच- १ औषधाची विना प्रिस्क्रिपशन आणि विनाबील विक्री केल्याचं निदर्शनास आले. बऱ्याच विक्री बिलावर फार्मासिस्टच्या सह्या नसल्याचंही आढळून आले. यावर सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभागान कल्पेश मेडिकल या दुकानदाराचा औषध विक्रीचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली.

डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घेण्याचं आवाहन

ग्राहकांनी परवानाधारक मेडिकल स्टोअर्समधून रजिस्टर्ड फार्मासिस्ट यांच्या उपस्थितीतच औषधे खरेदी करावी. औषधे घेतल्यानंतर बिल घ्यावे, डॉक्टरांना दाखवल्यानंतरच औषधांचं सेवन करावे, प्रिस्क्रिप्शननुसारच औषधे विकत मिळाली आहेत, याची खात्री करून बिल घ्यावं असं आवाहनही गिरीष बापट यांनी केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -