घरमुंबईसी.एस.एम.टी. स्थानकात 'फ्लॅश मॉब'द्वारे मतदान जनजागृती

सी.एस.एम.टी. स्थानकात ‘फ्लॅश मॉब’द्वारे मतदान जनजागृती

Subscribe

आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात मतदान जनजागृती फ्लॅशमॉबचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित प्रवाशांनी भरघोस प्रतिसाद दिला.

राज्यात २१ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडत आहे. मुंबई शहर जिल्ह्यात एकूण १० विधानसभा मतदारसंघ आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान जनजागृती अभियांतर्गत आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात मतदान जनजागृती फ्लॅशमॉबचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित प्रवाशांनी भरघोस प्रतिसाद दिला.

Voter awareness through the 'Flash Mob' at csmt station ३

मुंबई शहर जिल्ह्यात दहा विधानसभा मतदारसंघ असून २५ लाख ४ हजार ७३८ मतदार आहेत. मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती व्हावी, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मुंबई शहरातील सार्वजनिक ठिकाणी फ्लॅश मॉबचे आयोजन करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेस्थानकात प्रवाशांची लोकल ट्रेन पकडण्याची लगबग सुरू असतानाच तरुण-तरुणींनी फ्लॅश मॉबच्या माध्यमातून प्रवाशांना ‘मतदान करा आणि आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावा’, असे आवाहन मुंबईकरांना केले.

- Advertisement -

Voter awareness through the 'Flash Mob' at csmt station २

यावेळी ईव्हीएम, व्ही.व्ही.पॅट मशीनचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. पुढील काळात मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी या फ्लॅशमॉबचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई शहर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढण्यात मदत होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली.

- Advertisement -

Voter awareness through the 'Flash Mob' at csmt station १

हेही वाचा – अंबरनाथ मतदारसंघात १७ जण निवडणुकीच्या रिंगणात; दोघांची माघार

पथनाट्य, नृत्याच्या माध्यमातून जागृती

या फ्लॅश मॉबमध्ये पथनाट्य, नृत्य, देशभक्तीपर गीतातून राष्ट्रीय एकात्मतेच्या आणि विविध नाट्यस्वरुपातून योग्य तो संदेश युवा वर्गापर्यंत जातो. नृत्य आणि नाटक यांचा योग्य तो संगम साधून मतदारांना मतदानासाठी जागृत करण्यात येत आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी दिली. दरम्यान या ‘फ्लॅश मॉब’ला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी दिव्यांग नागरिकांनी व्हिलचेअरमध्ये बसून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -