घरक्रीडामी DRS उगाचच घेतला - लोकेश राहुल

मी DRS उगाचच घेतला – लोकेश राहुल

Subscribe

अफगाणिस्तानविरुद्ध भारताचे फलंदाज महेंद्रसिंग धोनी आणि दिनेश कार्तिक यांना पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसला. लोकेश राहुलने आधी डीआरएसचा (चुकीचा) वापर केल्यामुळे या दोघांना तंबूत परतावे लागले.

आशिया चषकाच्या ‘सुपर ४’ मधील भारत आणि अफगाणिस्तानचा सामना बरोबरीत सुटला. हा सामना जिंकण्यासाठी अफगाणिस्तानने भारताला २५३ धावांचे आव्हान दिले होते. पण चांगल्या सलामीवीरांनी दिलेल्या चांगल्या सुरुवातीनंतर भारताच्या मधल्या फळीने चांगले प्रदर्शन न केल्याने हा सामना बरोबरीत सुटला. त्यातच महेंद्रसिंग धोनी आणि दिनेश कार्तिक यांना पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसला. ते डीआरएसचा वापरही करू शकले नाही. याचे कारण लोकेश राहुलने आधी डीआरएसचा (चुकीचा) वापर केला होता.

मी रिव्हूवचा वापर केला नसता तर तो इतरांच्या कमी आला असता 

६० धावांवर असताना राहुलला रशीद खानने पायचीत बाद केले. पण या निर्णयाबाबत शंका असल्याने राहुलने डीआरएसचा वापर केला. यात तो आऊट असल्याचे दिसले. त्याच्या या निर्णयामुळे नंतर धोनी आणि कार्तिक डीआरएस वापरू शकले नाहीत. त्यामुळे राहुलने आपण उगाचच डीआरएस वापरल्याचे म्हटले, “मी डीआरएस उगाचच वापरला. पण मी बाद झालो त्यावेळी मला वाटले की बॉल कदाचित स्टॅम्पला लागणार नाही. त्यामुळे मी डीआरएसचा वापर केला. पण जर मी रिव्हूवचा वापर केला नसता तर तो इतरांच्या कमी आला असता.”

मधल्या फळीची चूक नाही

या सामन्यात भारताचे सलामीवीर राहुल आणि रायडू यांनी पहिल्या विकेसाठी ११० धावांची भागीदारी केली. पण हे दोघे बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांना चांगला खेळ करण्यात अपयश आले. त्याबद्दल राहुल म्हणाला, “हा सामना बरोबरीत संपला यात मधल्या फळीची चूक नाही. कारण बॉल जसजसा जुना होत होता तस तसे त्या पीचवर फलंदाजी करणे खूप अवघड होत होते. मी आणि रायडूने चांगली सुरुवात केल्यानंतर सामना जिंकवणे ही आमची जबाबदारी होती. पण आम्ही त्यात अपयशी झालो.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -