देखणं, दिमाखदार डॉ. आंबेडकरांचे स्मारक करणार

आज मकर संक्रांतीच्या दिवशी राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच मी देखील यापुढे गोड बोलण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकातील पुतळ्याची उंची १०० फुटाने वाढवून ३५० फूट केल्याचे सांगितले.