देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने आपल्या मुलाला सायकल घेऊन देणं शक्य झाले नाही, म्हणून वडिलांनी इंडियन जुगाड करून आपल्या मुलाला दुचाकीसारखी सायकल तयार करून दिली यावेळी मुलानेही आपल्या वडिलांना मदत केली. हा प्रकार पंजाबमधील लुधियाना येथील असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
#WATCH Ludhiana: A Class 8 student Harmanjot of Lakhoval village, with help from his father, has made a bicycle that looks like a scooter from the front & can be pedalled like a normal cycle.
He says, "Since my father couldn't get me a new cycle during #COVID19, so we made this." pic.twitter.com/f9UDsiv333— ANI (@ANI) August 25, 2020
लुधियानामधील लखोवल गावातील ही घटना आहे. इयत्ता ८ वीच्या वर्गात शिकणाऱ्या हरमनजोतच्या वडिलांनी स्कूटरसारखी सायकल तयार केली आहे. हा नवीन जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
असा आहे व्हिडिओ
कोरोना दरम्यान नवीन सायकल घेता येणं शक्य नसल्याने वडिलांसह ८ वीच्या मुलाने हा भन्नाट इंडियन जुगाड यशस्वी केला असल्याचे या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे.
सायकलचा पुढचा लूक स्कूटरसारखा असून मागे सायकलचं चाक लावण्यात आलं आहे. सायकलचं पॅंडल मारून ही चालवायला लागत असल्याचे या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे. समोरून स्कूटरसारखी दिसणारी ही सायकल सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.