घरट्रेंडिंगViral Video: हत्तीचे एक दिवसाचे पिल्लू पाहून तुम्हीही व्हाल खूश!

Viral Video: हत्तीचे एक दिवसाचे पिल्लू पाहून तुम्हीही व्हाल खूश!

Subscribe

अनेक हत्तींचे मोहक आणि हृदयस्पर्शी व्हिडिओ इंटरनेटवर तुम्ही पाहिले असतील. पण प्रत्येक गोंडस प्राण्याच्या व्हिडिओनंतर नवीन व्हिडिओ पाहण्याची इच्छा आपल्या मनात निर्माण होऊ लागते. असाच एक प्रेमात पाडणारा व्हिडिओ शेलड्रिक वाइल्डलाइफ ट्रस्टने शेअर केला आहे. केनियामधील शेल्ड्रिक वाइल्डलाइफ ट्रस्ट हत्तींच्या अनाथ पिल्लांना वाचवून त्यांचे पुनर्वसन करणारी एक संस्था आहे.

ट्रस्टच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर नुकताच त्यांनी हत्तीच्या एका दिवसाच्या पिल्लूचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ जेव्हा पिल्लू एका दिवसापेक्षा कमी वयाचा होता आणि त्या पिलाची आई त्याच्या बरोबर त्या भागात फिरत होता तेव्हा हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे.

- Advertisement -

ट्रस्टने कॅप्शनसह व्हिडिओ पोस्ट केला आहे, “पिटर पॅटर – लेपा इथुम्बाजवळ लहान पायांचा आवाज करत येतो. लेनाचा नवीन पिल्लू आणि शेलड्रिक ट्रस्टमध्ये जन्मलेला ३७ वं हत्तीचं पिल्लू असल्याचे सांगितले जात आहे. जेव्हा ते पिल्लू एक दिवसापेक्षा लहान होतं तेव्हा हा व्हिडिओ करण्यात आला आहे.

- Advertisement -

व्हिडिओमध्ये, लेपा तिच्या आईच्या खाली उभे राहून, पाणी पित असल्याचे दिसत आहे आणि तिच्या आईच्या मागे असल्याचे चित्र दिसत आहे. व्हिडिओ शेअर केल्यानंतर लोक यावर चांगल्याच कमेंट देखील देतांना दिसताय. तुम्ही देखील या लहान हत्तीच्या पिल्लूच्या प्रेमात पडाल यात काही शंकाच नाही…


बापरे! तब्बल १२०० रुपयांना विकली जाते ‘ही’ भाजी!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -