बॉलिवूड अभिनेत्रा तापसी पन्नू आता पुन्हा एकदा माध्यमांवर चिडलेली आहे. सध्या तापसीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. खरंतर हा व्हिडीओ नुकत्याच पार पडलेल्या ओटीटी प्ले अवॉर्ड्स 2022 मधील आहे. यावेळी तापसी पन्नू देखील उपस्थित होती. रेड कारपेटवर मीडिया इंट्रॅक्शन दरम्यान तापसीला तिच्य दोबारा चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. जे ऐकूण तापसी नाराज झाली.
तापसीला झाला राग अनावर
View this post on Instagram
मागील काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये ओटीटी प्ले अवॉर्ड्स 2022 हा पुरस्कार सोहळा पार पडला यावेळी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. यावेळी तापसी पन्नूने देखील हजेरी लावली होती. रेड कारपेटवर पत्रकारांशी संवाद साधन्यासाठी उभी होती, त्यावेळी तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले. एका पत्रकराने तापसीला “तुमच्या दोबारा चित्रपटाला सोशल मीडियावर विरोध केला जात आहे त्यावर तुम्ही काय सांगाल?” त्यावेळी तापसी चिडून म्हणाली की, “कोणत्या चित्रपटाला विरोध होत नाही ते तुम्ही सांगा?” त्यावेळी पत्रकाराने तिला आणखी एक प्रश्न तिला विचारला. त्यावेळी तापसीने त्याला म्हणाली की “तुम्ही आधी माझ्या प्रश्नचे उत्तर द्या, तुम्ही कोणताही प्रश्न विचारण्याआधी आपला नीट अभ्यास करून या आणि मगच मला प्रश्न विचारा” तेवढ्यात त्या ठिकाणी अनेकांचे आवाज येऊ लागले. त्यावेळी पत्रकारांना “आरडाओरड करू नका नाहीतर नंतर म्हणाल अभिनेत्रीला शिस्त नाहीये.”
दरम्यान, या ओटीटी प्ले अवॉर्ड्स 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. शिवाय नुकत्याच काही दिवसांपूीर्वी तापसीचा ‘दोबारा’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
हेही वाचा :