घरमनोरंजनआलिया भट्टचं होणार ग्रँड बेबी शॉवर; पण पार्टीत फक्त महिलांनाच एन्ट्री

आलिया भट्टचं होणार ग्रँड बेबी शॉवर; पण पार्टीत फक्त महिलांनाच एन्ट्री

Subscribe

सध्या आलियाची आई आणि सासू आलियाच्या बेबी शॉवर पार्टीची तयारी करत आहेत. मात्र, अशी चर्चा आहे की या बेबी शॉवर पार्टीमध्ये फक्त महिलाच उपस्थित असणार आहेत.

कपूर कुटुंबामध्ये लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. आलिया भट्ट लवकरच आई होणार असून आलियाची आई सोनी राजदान आणि सासू नीतू कपूर सध्या आलियाच्या बेबी शॉवर पार्टीची तयारी करत आहेत. एकीकडे आलिया सध्या तिच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तर दुसरीकडे आलिया तिचं खाजगी आयुष्य देखील आनंदात व्यतीत करत आहे. या वर्षी आलियाचे ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘डार्लिंग्स’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. तर याचं काळात आलियाचं रणबीर कपूरसोबत लग्न झालं. इतकंच नव्हे तर आलिया आता आई देखील होणार आहे. अशातच पाहिलं तर आलियासाठी 2022 सर्वात चांगलं वर्ष सिद्ध झालं.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या आलियाची आई आणि सासू आलियाच्या बेबी शॉवर पार्टीची तयारी करत आहेत. मात्र, अशी चर्चा आहे की या बेबी शॉवर पार्टीमध्ये फक्त महिलाच उपस्थित असणार आहेत.

- Advertisement -

घरातच होणार बेबी शॉवर पार्टी

मिळालेल्या माहितीनुसार, आलियाची बेबी शॉवर पार्टी त्यांच्या घरातच होऊ शकते किंवा दुसऱ्या एखाद्या ठिकाणी होऊ शकते. दरम्यान, याबाबत कोणताच खुलासा करण्यात आला नाही. मात्र या पार्टीमध्ये केवळ महिलाच उपस्थित असणार आहेत. या पार्टीमध्ये आलियाच्या बहिणी, जवळच्या मैत्रिणी तसेच रिद्धिमा कपूर साहनी, करीना कपूर खान, करिश्मा कपूर, अकांक्षा रंजन सिंह, नव्या नंदा, श्वेता बच्चन यांसारख्या जवळच्या आणि खास महिला उपस्थित असतील.

- Advertisement -

‘ब्रह्मास्त्र’ने जगभरातून कमावले इकते कोटी
‘ब्रह्मास्त्र’ने आत्तापर्यंत जगभरातून एकूण 225 कोटींचा टप्पा पार केला आहे. बॉलिवूड 2022 मधील हा सर्वात मोठा सुपरहिट असल्याचं म्हटलं जात आहे. ‘ब्रह्मास्त्र’ने टॉलिवूडमधील अनेक दिग्गज चित्रपटांना देखील मागे टाकायला सुरूवात केली आहे.


हेही वाचा :

‘ब्रह्मास्त्र’ने जगभरातून केला 225 कोटींचा टप्पा पार

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -