बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2018 मधील ‘जीरो’ चित्रपटानंतर शाहरुख बॉलिवूडमध्ये पुन्हा धमाकेदार कमबॅक करत आहे. 25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरुख व्यक्तिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.
He always gets a shotgun to the fight! 💥 #Pathaan
Celebrate #Pathaan with #YRF50 only at a big screen near you. Releasing in Hindi, Tamil and Telugu. pic.twitter.com/yFUyy2aMpr— Yash Raj Films (@yrf) December 6, 2022
नुकत्याच काही दिवसांपूर्वी ‘पठाण’ चित्रपटाचे टीझर प्रदर्शित करण्यात आले होते. दरम्यान, आता आणखी एक पोस्टर रिलीद करण्यात आले आहे. आता हा पोस्टर पाहून शाहरुखचे चाहते चित्रपट पाहण्यासाठी आणखी उत्सुक झाले आहेत. या पोस्टरमध्ये शाहरुख आपल्या मानेवर बंदूक ठेवली आहे. शिवाय पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलंय की, “तो नेहमी लढाईत शॉटगन घेतो. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.” या पोस्टरवर अनेकजण कमेंट्स देखील करु लागले आहेत.
‘डंकी’ आणि ‘जवान’मध्ये देखील दिसणार शाहरुख
शाहरुखच्या ‘डंकी’ चित्रपटापूर्वी ‘पठाण’ आणि ‘जवान’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ‘डंकी’ चित्रपटामध्ये शाहरुखसोबत अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत असतील तर, ‘जवान’मध्ये शाहरुख खानसोबत अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेत असेल.
हेही वाचा :