घरअर्थजगतकर्जे महागणार; रेपो दरात 0.35 टक्क्याची वाढ, भारतीय रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर

कर्जे महागणार; रेपो दरात 0.35 टक्क्याची वाढ, भारतीय रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर

Subscribe

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर झाले असून आरबीआयने रेपो दरात 0.35 टक्क्याची वाढ जाहीर केली आहे. तीन दिवस चाललेल्या चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीनंतर आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दरातील वाढीची घोषणा केली आहे. या वाढीमुळे रेपो रेट 5.4 टक्क्यांवरून 6.25 टक्के झाला आहे. रेपो दरात वाढ झाल्याने गृह कर्ज, वाहन कर्ज आणि इतर सर्व प्रकारची कर्जे महाग होतील. आरबीआय जेव्हा जेव्हा व्याजदर वाढवते तेव्हा त्याचा थेट परिणाम कर्जाच्या व्याजदरावर होतो.

- Advertisement -

एमपीसीने आज आपल्या बैठकीत लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटीअंतर्गत (एलएएफ) पॉलिसी रेपो दर 35 बेसिस पॉइंटने वाढविण्याचा निर्णय घेतला. आजची दरवाढ लक्षात घेता, गेल्या सात महिन्यांत आरबीआयने केलेली ही पाचवी वाढ आहे. आरबीआयने मे महिन्यात 0.40 टक्का तर, जून, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये प्रत्येकी 0.50 टक्क्याची वाढ केली आहे. एमपीसीच्या सहापैकी पाच सदस्यांनी रेपो दरात वाढ करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे, असे सांगून आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, ग्रामीण भागातील मागणीत सुधारणा दिसून येत आहे. ग्राहकांचा आत्मविश्वासही वाढला आहे.

सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी जीडीपी 6.8 टक्के राहण्याचा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे. सप्टेंबरमध्ये आरबीआयने 7 टक्क्यांचा अंदाज वर्तविला होता. पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विकास दर 7.1 टक्के असू शकतो, असे आरबीआयने म्हटले आहे.

- Advertisement -

रेपो दर वाढीची घोषणा करताना आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, पुढील चार महिन्यांत महागाईचा दर 4 टक्क्यांच्या वर राहण्याची शक्यता आहे. चलनवाढीचा दर चालू आर्थिक वर्षात 6.7 टक्के राहण्याचा अंदाज आहे, तर पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तो सुमारे 5 टक्के राहण्याचा अंदाज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -