T 3027 – Prepping for the World Cup 2022 – !! and .. well .. ya .. !!! pic.twitter.com/7EHPL4Riat
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 14, 2018
‘झुंड’ चित्रपटाचा निर्माता नागराज मंजुळेने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर शूटिंगच्या लाईट्सचा एक फोटो शेअर केला होता, ज्याला त्याने ‘लाईट्स ऑन’ असं कॅप्शन दिलं आहे. त्यानंतर बिग बींनीही ट्वीटरद्वारे नागपूरात चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला होता. नागराज मंजुळे या चित्रपटाचा निर्माता आहे तर भूषण कुमार या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. याविषयी एका मुलाखतीमध्ये बोलताना नागराज मंजुळे म्हणाले, ‘लहानपणापसून ज्यांचे चित्रपट पाहत आलो ते माझ्या चित्रपटात काम करणार हे माझं भाग्य आहे. मला माझं स्वप्न सत्यात उतरल्याचा भास होतो आहे. महानायक अमिताभ बच्चन ज्यांच्यावर जगभरातील लोक प्रेम करतात, त्यांच्या अभिनयाचं कौतुक करतात ते माझ्यासोबत काम करणार याहून मोठी गोष्ट काय… अशी भावना नागराजने व्यक्त केली होती.