घरमहाराष्ट्रहरवलेल्या मुलीचा दोन तासात भोसरी पोलिसांनी लावला छडा

हरवलेल्या मुलीचा दोन तासात भोसरी पोलिसांनी लावला छडा

Subscribe

आलीया घरातून कुठे गेली असेल याचा शोध घेण्यासाठी रस्त्यावरील प्रत्येक सिसिटीव्ही भोसरी पोलिसांनी पाहिले. एका सीसीटीव्हीमध्ये आलिया चालत जात असल्याचे दिसले. यावरूनच पोलिसांनी त्या दिशेने जात रात्री १० च्या सुमारास आलियाला शोधले.

पालकांनो आपल्या लहान मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. कारण पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परिसरात तब्बल सात तास साडेचार वर्षाची आलिया हरवली होती. तिचा शोध सर्वत्र घेतला जात होता परंतु तिचा थान पत्ता लागत नव्हता. आलीयाचे आई – वडील घाबरलेले होते. आपली एकुलती एक मुलगी गेली कुठे हा त्यांच्यापुढे प्रश्न होता. आपल्या मुलीचे अपहरण तर झाले नाही असे अनेक प्रश्न वडील मोहम्मद हैदर खान यांना पडले होते. खान यांनी आलिया सापडत नसल्याने शेवटी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. भोसरी पोलीस आणि गुन्हे शाखा -१ यांनी अवघ्या काही तासात आलीयाला शोधून काढले.

खेळता – खेळता आलीया हरवली

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून अपहरणाच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पालक हे नेहमी घाबरलेल्या अवस्थेत असतात. आलिया मोहम्मद खान वय साडेचार वर्ष ही शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास खेळता खेळता घराबाहेर निघून गेली.आलीया नेहमीच बाहेरील परिसरात खेळत असते त्यामुळे आईने तिच्याकडे लक्ष दिले नाही. यावेळी आलिया खेळून झाल्यानंतर घरात आलीच नाही. आईने बाहेर येऊन पाहिले असता आलिया दिसली नाही. तिने आलियाला इकडे- तिकडे शोधले. आलिया ही खान कुटुंबाची एकुलती एक मुलगी होती. अलियाचा शोध ते राहत असलेला भगतवस्ती परिसरात करत होते. संपूर्ण परिसर पिंजून काढला मात्र आलिया काही सापडत नव्हती.

- Advertisement -

अखेर आलिया सापडली

आलिया सापडत नसल्याने शेवटी तिच्या वडिलांनी रात्री आठ वाजता भोसरी पोलीस ठाण्यात आलिया हरवल्याची तक्रार दाखल केली. भोसरी पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेत गुन्हे शाखा -१ असे एकूण ३५ ते ४० अधिकारी आणि कर्मचारी आलियाला शोधत होते. आलीया घरातून कुठे गेली असेल याचा शोध घेण्यासाठी रस्त्यावरील प्रत्येक सिसिटीव्ही भोसरी पोलिसांनी पाहिले. एका सीसीटीव्हीमध्ये आलिया चालत जात असल्याचे दिसले. यावरूनच पोलिसांनी त्या दिशेने जात रात्री १० च्या सुमारास आलियाला शोधले. हे यश भोसरी पोलीस आणि गुन्हे शाखा – १ यांना मिळाले होते. आलीया घरापासून दीड किलोमीटर चालत चालत गेली होती. आलिया सापडल्यानंतर तिच्या आई-वडिलांना आनंद अनावर झाला. दरम्यान भोसरी पोलिसांनी पालकांनी आपल्या मुलांवर काळजीपूर्वक लक्ष ठेवा असे आवाहन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -