भारतात इतर चित्रपटांच्या तुलनेत साऊथच्या चित्रपटांचे अनेक चाहते आहेत. या चित्रपटांची कथा प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करते. चाहते नेहमीच या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. साऊथ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक मणिरत्नमचा ‘पोन्नियन सेल्वन’ हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि त्याने जबरदस्त कमाई केली. आता ‘पोन्नियन सेल्वन 2′ चित्रपटाचा दुसरा भाग 28 एप्रिल 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘पोन्नियन सेल्वन 2′चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे.
‘पोन्नियन सेल्वन 2′ चा ट्रेलर प्रदर्शित
‘पोन्नियन सेल्वन 2′मध्ये अभिनेत्री ऐश्वर्या नंदिनी आणि मंदाकिनी अशा दोन भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘पोन्नियिन सेल्वन 2’मध्ये, नंदिनीने चोल साम्राज्याचा अंत करण्याचे व्रत घेतले आहे. या कथेतील सिंहासनाबाबत सुरू असलेले राजकारण यावेळी महायुद्ध शिगेला पोहोचेल. PS 1 मध्ये चोल शासकांची कथा दाखवण्यात आली होती. आता या भागात चोल शासकांमधील सिंहासनाचे मोठे युद्ध पाहायला मिळेल.
‘पोन्नियन सेल्वन 2′ मध्ये दिसणार हे कलाकार
A world of glory, pride and history welcomes you back!
Here’s the Trailer of #PS2
▶ https://t.co/kHbIuwmNAC#CholasAreBack #PonniyinSelvan2 #PS2Trailer #ManiRatnam @arrahman @madrastalkies_ @LycaProductions @Tipsofficial @tipsmusicsouth @IMAX @primevideoIN #PenMarudhar pic.twitter.com/Rw7a2c9rUK— Lyca Productions (@LycaProductions) March 29, 2023
‘पोन्नियन सेल्वन 2’ चित्रपटात चियान विक्रम, कार्ती, जयम रवी, त्रिशा कृष्णन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शक मणिरत्नम यांचा चित्रपट पहिल्या भागाप्रमाणेच कमाई करेल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. ‘पोन्नियन सेल्वन’ चित्रपटाने भारतात 250 कोटी आणि जगभरात 450 कोटींची कमाई केली होती.
हेही वाचा :