मेष : उत्साह वाढेल. आनंदी रहाल. नवीन कार्याचा विचार यशस्वी करून दाखवणारी योजना बनवता येईल.
वृषभ : धंद्यात फायदा होईल. गोड बोलून तुमचे काम होईल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.
मिथुन : आनंदी रहा. धंद्यात वाढ होईल. तुम्हाला चांगली बातमी ऐकावयास मिळेल. राग आवरा.
कर्क : स्पर्धेत जिंकाल. मान-सन्मान मिळेल. नवे कार्य आरंभ करता येईल. लोक साथ देतील.
सिंह : तुमच्या मनावर जबाबदारीचे दडपण येईल. जवळचे लोक मदत करतील. उत्साह राहील.
कन्या : विचारांना चालना मिळेल. कार्य करण्यासाठी नवी प्रेरणा मिळेल. कामात मोठे यश मिळवाल.
तूळ : जुन्या आठवणीने मन भारावून जाईल. धंदा वाढेल. पाहुणे येतील. आनंदाची बातमी मिळेल.
वृश्चिक : नव्या विचाराने तुम्ही गतिमान व्हाल. धंद्यात काय सुधारणा करता येईल, ते ठरवाल.
धनु : मन प्रसन्न राहील. पाहुण्यांचे स्वागत कराल. नवीन ओळखीचा फायदा मिळेल. धंदा वाढेल.
मकर : तुमचे बोलणे प्रभावी ठरेल. नव्या लोकांच्या सहवासाने प्रेरणा मिळेल. आवडते पदार्थ सेवनास मिळतील.
कुंभ : कामाचा व्याप वाढेल. आनंदी रहाल. किरकोळ अडचण येईल. सावधपणे कामे करा.
मीन : आनंदाच्या भरात कुणालाही मोठे आश्वासन देऊ नका. पदाधिकार मिळेल. प्रतिष्ठा वाढेल.