घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

एकीं ययापरी पार्था । दोषु क्षाळिले सर्वथा । आणिकीं हृदयारणीं मंथा । विवेकु केला ॥
पार्था, अशाप्रकारे कोणी आपल्या सर्व दोषाचे क्षालन केले; कोणी हृदयरूप अरणीवर विचाररूप मंथा केला व
तो उपशमें निहटिला । धैर्येंवरी दाटिला । गुरुवाक्यें काढिला । बळकटपणें ॥
तो धैर्यरूप भाराने दाबून आणि शांतिरूप रज्जूने घुसळून, गुरुवाक्यरूप मंत्राने मंथन केला.
ऐसें समरसें मंथन केलें । तेथ झडकरी काजा आलें । जें उज्जीवन जाहलें । ज्ञानाग्नीचें ॥
अशाप्रकारे सर्व वृत्तीचे ऐक्य करून मंथन केल्याने तेथे तात्काळ कार्य झाले. (ते कोणते?) तर ज्ञानाग्नी प्रज्वलित झाला!
पहिला ऋद्धिसिद्धींचा संभ्रमु । तो निवर्तोनि गेला धूमु । मग प्रगटला सूक्ष्मु । विस्फुलिंगु ॥
तेव्हा प्रथम ऋद्धिसिद्धीचा मोह हाच उत्पन्न झालेला धूर नाहीसा होऊन मग सूक्ष्म अशी अग्नीची ठिणगी उत्पन्न झाली.
तया मनाचें मोकळें । तेंचि पेटवण घातलें । जें यमनियमीं हळुवारलें । आइतें होतें ॥
शमदमानी शुष्क (वाळलेले) झालेले जे निर्दोष मन, त्याचे अग्नीला पेटवण घातले.
तेणें सादुकुपणें ज्वाळा समृद्धा । मग वासनांतराचिया समिधा । स्नेहेंसीं नानाविधा । जाळिलिया ॥
त्याच्या साहाय्याने मोठी ज्वाला उत्पन्न झाली. नंतर वासनारूप समिधांना अनेक प्रकारचा मोह हे धृत लावून त्या जाळल्या;
तेथ सोहंमंत्रें दीक्षितीं । इंद्रियकर्मांच्या आहुती । तियें ज्ञानानळीं प्रदीप्तीं । दिधलिया ॥
नंतर जीवरूप दीक्षिताने ज्ञानरूपी प्रदीप्त केलेल्या अग्नीत इंद्रियकर्माची आहुती दिली.
पाठीं प्राणक्रियेचिये स्रवेनिशीं । पूर्णाहुती पडली हुताशीं । तेथ अवभृत समरसीं । सहजें जहालें ॥
शेवटी, प्राणकर्म याच स्रुवा नावाच्या यज्ञपात्रासह अग्नीमध्ये पूर्ण आहुती दिल्यावर, ऐक्यबोध हे (यज्ञाच्या शेवटचे) अवभृथस्थान सहज घडले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -