घरताज्या घडामोडीLok Sabha 2024 : दानवे-खोतकर एका कार्यक्रमात, पण एकमेकांशी बोलले नाहीत; महायुतीतील...

Lok Sabha 2024 : दानवे-खोतकर एका कार्यक्रमात, पण एकमेकांशी बोलले नाहीत; महायुतीतील नेत्यांमध्ये नाराजी कायम

Subscribe

लोकसभा निवडणूक 2024 साठी राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. त्यासाठी उमेदवारही जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, यंदा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढत असतानाही भाजप आणि शिवसेनेतील काही नेत्यांमध्ये नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे.

जालना : लोकसभा निवडणूक 2024 साठी राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. त्यासाठी उमेदवारही जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, यंदा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढत असतानाही भाजप आणि शिवसेनेतील काही नेत्यांमध्ये नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. असाच काहीसा प्रकार जालन्यात पाहायला मिळाला. जालना लोकसभेचे भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या पुन्हा एकदा अबोला पाहायला मिळाला. (jalna lok sabha constituency raosaheb danve and arjun khotkar not talk to each others)

मिळालेल्या माहितीनुसार, जालना शहरात ब्राह्मण समाजाच्या उपनयन कार्यक्रमांमध्ये रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर वेगवेगळ्या ठिकाणी बसल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमात जवळपास अर्धा तास एकाच ठिकाणी हे दोन्ही नेते बसले होते. परंतू, दोघांमध्ये कोणतीही संवाद झाला नाही. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी कायम असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : सध्याच्या राज्यकर्त्यांचे सगळेच उफराटे, ठाकरे गटाचे टीकास्त्र

दरम्यान, रावसाहेब दानवे आणि अर्जून खोतकर हे 15 दिवसांपूर्वीच राजकीय वैमनस्य विसरून प्रचारासाठी एका व्यासपीठावर आले होते. यावेळी दोघांनी एकत्रित प्रचार करण्याचा निर्धार ही बोलून दाखवला. मात्र, एकाच कार्यक्रमात असून सुद्धा दोघांत कोणतीही संवाद न झाल्याने पुन्हा दोघांत काही बिनसलंय का, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

- Advertisement -

यंदा लोकसभा निवडणूक 2024 साठी जालन्यातून भाजपने पुन्हा एकदा रावसाहेब दानवे यांना संधी दिली आहे. रावसाहेब दानवे हे सहाव्यांदा लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने काँग्रेसच्या कल्याण काळे यांना रिंगणात उतरवले आहे. मात्र सद्यस्थितीत रावसाहेब दानवे यांचे पारडे जड मानले जात आहे. मात्र, मतदार या मतदारसंघात कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – DADAR NEWS : दादरमध्ये 1 लाख 80 हजार रुपयांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -