बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांच्या ‘सांड की आंख’ या चित्रपटातील पहिला लूक समोर आला आहे. या चित्रपटाचे काही फोटो यापुर्वी ही प्रदर्शित करण्यात आले होते. परंतु, तापसी-भूमीचे फोटो प्रथमच रिलीज करण्यात आले आहे. ‘सांड की आंख’ या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये दोन्ही अभिनेत्री वृद्ध शुटर्स महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या चेहऱ्यावरील वृद्धत्व दिसावे याकरिता उत्तम मेकअप टेक्निकचा वापर करण्यात आला आहे. हा चित्रपट दिवाळीमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
‘सांड की आंख’ या चित्रपटाच्या फर्स्ट लूक पोस्टर्सला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तसेच, या चित्रपटाचे दोन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. पहिल्या पोस्टरमध्ये तापसी आणि भूमी घागरा, कुर्ता घातलेल्या दिसत आहे. त्या पोस्टरवर “तन बूढ़ा होता है, मन बूढ़ा नहीं होता.” अशी टॅगलाईन दिसत आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये असे लिहीले आहे की, ६० वर्षात ७०० मेडल जिंकले.
Make way for the dadis ??
Bringing to you one of my most challenging roles in one of the most inspiring stories…#SaandKiAankh #SaandKiAankhThisDiwali @taapsee @prakashjha27 @ItsVineetSingh @tushar1307 @anuragkashyap72 @RelianceEnt @realshooterdadi @shooterdadi @nidhiparmar pic.twitter.com/wC5NYpQwRq— bhumi pednekar (@bhumipednekar) April 16, 2019
या चित्रपटाचे पोस्चर तापसीने शेअर करत असे म्हटले की, या दिवाळीत फटाखे नाही गोळ्या चालणार…तर भूमीने हा लूक शेअर करताना लिहीले की, ही भूमिका आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा कठीण परंतु प्रोत्साहन देणाऱ्यांपैकी एक आहे.
Here it is bullseye “साँड़ की आँख” pic.twitter.com/VIFGaywjQx
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) April 16, 2019
‘सांड की आंख’मध्ये तापसी शिवाय प्रकाश झा शिवाय विनीत सिंहही महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाची निर्मिती परमार आणि अनुराग कश्यप करत आहे. तसेच तुषार हीरानंदानी यांचे दिग्दर्शन असेल.