घरभक्तीShiv Tandav Stotram : शिव-तांडव स्तोत्र पठणाचे आहेत अनेक फायदे; जाणून घ्या...

Shiv Tandav Stotram : शिव-तांडव स्तोत्र पठणाचे आहेत अनेक फायदे; जाणून घ्या योग्य नियम

Subscribe

हिंदू धर्मात देवी-देवातांच्या नियमित पूजेसोबतच त्यांच्या मंत्राचं आणि स्तोत्रांचं पठण करणं महत्त्वपूर्ण मानलं जातं. आठवड्यातील प्रत्येक वार वेग-वेगळ्या देवी-देवातांना समर्पित करण्यात आला आहे. सोमवार आणि महिन्यातील प्रदोष व्रत भगवान शंकराला समर्पित करण्यात आले आहे. या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही शिव-तांडव स्तोत्राचे पठण करु शकता. या स्तोत्राच्या पठणाचे अनेक फायदे आहेत.

शिव-तांडव स्तोत्राचे फायदे

Shiv Tandav Stotra And Its Significance - Boldsky.com

- Advertisement -
  • शिव-तांडव स्तोत्राचे पठण केल्याने व्यक्ती आयुष्यातील अनेक समस्या दूर होतात.
  • दररोज या स्तोत्राचे पठण केल्याने वाणीदोष दूर होतो.
  • या स्तोत्राच्या पठणाने चेहऱ्यावर तेज येते.
  • शिव-तांडव स्तोत्राचे पठण करणाऱ्या व्यक्तीला धन-संपत्तीची कमतरता भासत नाही.
  • ज्या लोकांच्या कुंडलीत सर्प योग, कालसर्प योग किंवा पितृदोष आहे त्यांनीही शिव तांडव स्तोत्राचे पठण करावे.
  • शिव-तांडव स्तोत्राचे पठण केल्याने शनि, राहू, केतूच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते.

शिव-तांडव स्तोत्र पठण करण्याचा विधी

Best Shiva Nataraja ideas. nataraja, shiva, hindu gods, Dancing Shiva HD wallpaper | Pxfuel

  • धार्मिक ग्रंथानुसार सकाळी किंवा संध्याकाळी शिव-तांडव स्तोत्र पठण करणे उत्तम मानले जाते.
  • सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
  • घरातील स्वच्छ ठिकाणी बसून समोर धूप, दिप लावून या स्तोत्राचे पठण करावे.
  • स्तोत्र पठण करताना कोणताही वाईट, नकारात्मक विचार मनात आणू नये.
  • स्तोेत्र पठण करताना मग एकाग्र करावे.

हेही वाचा :

सर्वश्रेष्ठ गायत्री मंत्राने होतात सर्व मनोकामना पूर्ण; जाणून घ्या ‘या’ मंत्राचा अर्थ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -