घरभक्तीGayatri Mantra : सर्वश्रेष्ठ गायत्री मंत्राने होतात सर्व मनोकामना पूर्ण; जाणून घ्या...

Gayatri Mantra : सर्वश्रेष्ठ गायत्री मंत्राने होतात सर्व मनोकामना पूर्ण; जाणून घ्या ‘या’ मंत्राचा अर्थ

Subscribe

हिंदू धर्मात गायत्री मंत्राला सर्वश्रेष्ठ मानलं जातं. शास्त्रात सांगण्यात आलंय की, दररोज गायत्री मंत्राचा जप केल्याने तसेच त्याच्या नियमांचे पालन केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि देवी-देवतांचा आर्शिवाद तुमच्यावर सदैव राहतो. या मंत्राच्या जपाने आयुष्यातील नकारात्मक दोष देखील दूर होतात आणि व्यक्तीला मनःशांती मिळते.

ब्रह्मा विष्णू आणि महेश देखील करतात गायत्री मातेची पूजा

Trijuti Rudraksha: Brahma, Vishnu, Mahesh - Story, Mantra, Symbol

- Advertisement -

 

हिंदू मान्यतेनुसार, गायत्री देवीला सर्वात शक्तीशाली मानले जाते.ब्रह्मा विष्णू आणि महेश हे त्रिदेव देखील गायत्री मातेची पूजा करतात. सृष्टीच्या प्रारंभी जेव्हा ब्रह्माजींनी माता गायत्रीला आवाहन केले तेव्हा त्यांच्या मुखातून गायत्री मंत्र बाहेर पडला. या मंत्रात चारही वेदांचे सार दडलेले आहे त्याच्या 24 अक्षरांमध्ये 24 शक्ती आहेत. हा मंत्र कोणत्याही कामात यश मिळवून देतो. पूर्वी गायत्री मंत्र हा केवळ देवी-देवतांपर्यंत मर्यादित होता, परंतु महर्षी विश्वामित्रांनी कठोर तपश्चर्या करून हा मंत्र सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवला.

- Advertisement -

गायत्री मंत्र

गायत्री मंत्र नियम: गायत्री मंत्राचा जप करण्याचा नियम जाणून घ्या.

‘ॐ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि। धियो यो न: प्रचोदयात्।।’

  • गायत्री मंत्राचा अर्थ

गायत्री मंत्राचा जप करण्यापूर्वी गायत्री मंत्राचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. गायत्री मंत्र ‘ॐ भुरभव: स्व: तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात’ म्हणजे आपण त्या जीवन-रूपाचे, दुःख-संहारक, सुख-रूप, श्रेष्ठ, तेजस्वी, पाप-नाशक, ईश्वर-रूपाचे ध्यान केले पाहिजे. देव आपल्या बुद्धीला योग्य मार्गाची प्रेरणा देवो.

  • गायत्री मंत्राचा जप कधी करावा?

या मंत्राचा जप पहाटे ब्रह्म मुहूर्तापासून ते सूर्योदयापर्यंत केला जातो.

त्यानंतर तुम्ही संध्याकाळी देखील या मंत्राचा जप करु शकता.

  • गायत्री मंत्राचा जप कसा करावा?

Petrichor Original Rudraksha Mala (10 mm to 12 MM) with Certificate for Women & Men Daily Wear or Japa Mala : Amazon.com.au: Clothing, Shoes & Accessories

या मंत्राचा जप घरातील स्वच्छ , पवित्र जागेवर आसनावर बसून करावा.

मंत्र जप करताना स्वच्छ वस्त्र परिधान करावे.

गायत्री मंत्राचा जप करण्यासाठी रुद्राक्षाच्या माळेचा वापर करावा.

गायत्री मंत्राचा जप कधीही आपल्या गुरु किंवा पुरोहिताच्या मार्गदर्शनाखालीच करावा.

 


हेही वाचा :

कराग्रे वसते लक्ष्मी… सकाळी उठल्यावर हाताच्या तळव्यांकडे पाहून का म्हणतात हा श्लोक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -